ETV Bharat / state

Bogus BMC officer : बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत चोरीचा प्रयत्न;  आरोपी अटकेत - ओशिवरा पोलिसांनी केली अटक

राहत्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर रिनोव्हेशनचे काम चालू ( Illegal renovation work going on in the flat ) असल्याची बतावणी करत तक्रारदाराच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून घेण्याचा प्रयत्न ( Trying to pull the gold chain) बोगस बीएमसी अधिकाऱ्याने केला.

Bogus BMC officer
बीएमसी अधिकारी
author img

By

Published : Nov 23, 2022, 2:24 PM IST

मुंबई : राहत्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर रिनोव्हेशनचे काम चालू ( Illegal renovation work going on in the flat ) असल्याची बतावणी करत तक्रारदाराच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून घेण्याचा प्रयत्न ( Trying to pull the gold chain ) बोगस बीएमसी अधिकाऱ्याने केला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी या बोगस बीएमसी अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय धोत्रे वय २४ असे आरोपीचे नाव आहे.

सोनसाखळी खेचली : खार दांडा येथे राहणाऱ्या अक्षय धोत्रे याने तक्रारदार मंजू जैन या ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी या बोगस बीएमसी अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. मंजू या आयर्लंड पार्क सोसायटी लोखंडवाला अंधेरी पश्चिम येथे राहतात. ११ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजताच्या सुमारास मंजू यांच्या अंधेरी येथील घरी अक्षय धोत्रे नावाच्या इसमाने येऊन तो बीएमसी के ईस्ट वार्ड अंधेरी पश्चिम मेंटेनेस विभागातून आला असल्याचे बतावणी केली.

पोलीस तक्रार दाखल : नंतर मंजू यांचा फ्लॅटमध्ये बेकायदेशीर रेनोवेशनचे काम चालु असल्याची माहिती मिळाल्याने तो आला असल्याचे सांगितले आणि त्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली. त्यावेळी मंजू यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्याने मंजू यांना धक्का देऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कामगार पुढे आले. त्यामुळे अक्षय धोत्रे तेथून पळून गेला. याप्रकरणी मंजू जैन यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सापळा रचून पकडले : या गुन्ह्याचा तपास ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनवडे, पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ओशिवरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्य्क पोलीस निरीक्षक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना गुप्त बातमीदाराकडुन तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील प्राप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती प्राप्त करून अक्षय हा आरोपी खार रेल्वे परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खार रेल्वे परिसरातून त्याला शिताफीने पकडण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.