मुंबई - नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे अनाथ मुलांच्या बालगृहात नारायणचंद्र ट्रस्ट संस्थेचा 20 व्या वर्धापनदिनानिम्मित्त स्नेह संमेलन मेळावा पार पडला. या कार्यक्रमात संस्थेतील बालकांनी आणि महिला वसतीगृहातील मुलीनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. बालकांनी विविध क्षेत्रात शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल सर्व बालकांचा सत्कार करून प्रोत्साहनपर भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. या संस्थेत सर्व बालके अनाथ व निराधार आहेत. या कार्यक्रमाला विरार, नालासोपारा,वसई आणि मुंबईतून सुमारे 300 हितचिंतक उपस्थित होते.
हेही वाचा - 'आता पुन्हा विकासाकडे लक्ष देण्याची गरज'
संस्थेचे विश्वस्त प्रमुख डॉ. नारायण मालपाणी हे स्नेहसंमेलनाला प्रामुख्याने उपस्थित होते. बँक ऑफ बडोदा, विरारचे व्यवस्थापक सुमन सरोज हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संचालक विजय सराटे यांनी संस्थेच्या कार्याची ओळख प्रस्तावनेद्वारे करून दिली. नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम असे विवध प्रकल्प संस्था राबवीत असून सुमारे 800 गरजू लोकांनी या योजनांचा आत्तापर्यंत लाभ घेतला आहे.
हेही वाचा - 'जन की बात' ऐकल्यानेच 'आप'चा विजय - मनीषा कायंदे