मुंबई : मुंबईत टॅक्सी, रिक्षा चालकांकडून सर्रास भाडं नाकारलं जाण्याच्या घटना वारंवार ( Drivers are still refusing passengers ) घडतात. अनेकदा, रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही रिक्षा - टॅक्सी चालकांच्या या मुजोरीला सामोरे जावे ( Action against rickshaw drivers ) लागते. मात्र, आता मुंबई पोलिसांच्या एका आदेशामुळं मुंबईकरांचा त्रास कमी होणार असल्याची अपेक्षा होती. मात्र, मुंबईकरांची ही अपेक्षेचा काही परिसरात अपेक्षा भंग झाला आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी एक मोहिम सुरू केली असून ( Action against rickshaw, taxi drivers who refuse fare ) त्याबाबत एक पत्रक काढले आहे. मात्र, तरीदेखील मुंबई पोलिसांच्या कारवाईला न जुमानता प्रवाशी नाकारताना दिसतात. मुंबईतील नरिमन पॉंईंट, वांद्रे येथील कला नगर परिसरात जाऊन ईटीव्ही भारतने याबाबत आढावा घेतला आहे.
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई - मुंबईत अनेकदा टॅक्सी किंवा रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध असतानाही भाडे नाकारले जाते. मात्र, आता त्याला आळा बसवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पत्रक काढून मोहीम सुरु केली आहे. मात्र, ती काही ठिकाणी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई ( Action against rickshaw, taxi drivers who refuse fare ) करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, टॅक्सी आणि रिक्षाचालकांना त्याचा वचक राहिलेला दिसत नाही. जर भाडे नाकारण्याची तक्रार आलीच तर संबंधितांवर मोटार वाहन कायदा १७८(३) अन्वये कारवाई करण्यात यावी, असं आदेशही पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
रिक्षा चालकांची मुजोरी सर्रास सुरु - वांद्रे येथील कलानगर येथे कामावरून घरी परताना अनेकांना रिक्षाचालकांच्या नकाराला तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र दिसलं. मात्र, तेथे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर नरिमन पॉंईंट येथे देखील फ्री प्रेस रोडवर चर्चगेट किंवा सीएसटीएम रेल्व स्टेशनकडे जाण्यास एकही टॅक्सिचालक तयार नव्हता. काही चालक गॅस संपला, तर काही घरी जाण्याचं कारण सांगून प्रवासी नाकारतात. अनेकदा रात्रीच्यावेळी खासकरून महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने या ठराविक काही परिसरात जेथे टॅक्सी आणि रिक्षा चालकांची मुजोरी सर्रास सुरु आहे, तिथे लक्ष घालून कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.