ETV Bharat / state

Opposition Parties Meeting Patna : पाटणात विरोधी पक्षांची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार - Opposition parties meeting

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जास्तीत जास्त पक्षांची एकजूट करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

Opposition Parties Meeting Patna
Opposition Parties Meeting Patna
author img

By

Published : Jun 22, 2023, 4:32 PM IST

रविंद्र चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री

मुंबई : देशातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या भ्रष्टाचार, महागाईविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा विचार करत आहेत. त्या निमित्ताने केसीआर, ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राला महत्त्व प्राप्त होत आहे.

पवारांचे सर्वसमावेशक नेतृत्व : गेल्या ४५ वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात वावरणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी शरद पवारांचे संबंध, पवारांच्या शब्दाला दिलेला मान लक्षात घेता या बैठकीत शरद पवार यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. शरद पवार हे सर्वसमावेशक नेते असल्यामुळे देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यात आणि एक समान अजेंडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा स्वतः नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे.

भाजप विरोधात एकत्रित लढा : मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी स्पष्ट विधान केले. पाटणा येथे होणाऱ्या या बैठकीसाठी आपल्याला नितीशकुमार यांचा फोन आला असून त्यानुसार आपण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. या बैठकीला देशातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला आपणही उपस्थित राहणार आहोत, असे सांगून पवार म्हणाले की, राष्ट्रीय प्रश्नांवर एकत्र काम करून भाजप विरोधात एकत्रित लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे या होणाऱ्या युतीला पाठिंबा देण्याची जबाबदारी आपली असल्याचे पवार म्हणाले होते.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देशातील दोन मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तरच देशाचे हित साधले जाईल, हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. - रविंद्र चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री

राहुल गांधी, उद्धव ठाकरे ही राहणार उपस्थित : या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसशिवाय विरोधी महाआघाडीला पर्याय नसल्याचे शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 23 जून रोजी सकाळी सात वाजता या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी ते मुंबईहून रवाना होणार असल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे. त्याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

एकत्रित धोरण तयार करण्यावर सहमती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर असतांना म्हणाले होते. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत एकमत केले होते. पाटणा येथे होणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीत यावर अधिक चर्चा होणार आहे.

त्यांच्या मनात पंतप्रधान मोदीच : पाटणा येथे होणाऱ्या या बैठकीला राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे नेते उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षांची ही युती कितपत प्रभावी ठरेल हे येणारा काळच ठरवणार आहे. यावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देशातील दोन मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तरच देशाचे हित साधले जाईल, हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील असे ते म्हणाले.

हेही वाचा - NCP Anniversary : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नाही; संघटनेचे कोणतेही पद द्या - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.