ETV Bharat / state

'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोव्हिड योद्ध्यांचा विसर' - मनिषा कायंदे शिवसेना लेटेस्ट बातमी

कोव्हिड योद्ध्यांना धन्यवाद देणारी एखादी ओळ आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये न उच्चारणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत. तो कदाचित एक नवीन विक्रमच ठरेल अशी टीका शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.

manisha kayande (spokesperson)
मनिषा कायंदे (प्रवक्त्या, शिवसेना)
author img

By

Published : May 28, 2020, 11:39 AM IST

मुंबई - कोरोनाच्या या महासंकटाविरूद्ध अनेक जण आपापल्या स्तरावर लढत आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कोव्हिड संकटाविरूद्ध लढणाऱ्यांना धन्यवाद देणारी एखादी ओळही आपल्या पत्रकार परिषदेत उच्चारली नाही. अशा प्रकारचे देवेंद्र फडणवीस हे भारतातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत. तसेच तो एक नवीन विक्रमच ठरेल, अशी टीका शिवसेनेच्या नेते मनिषा कायंदे यांनी केली आहे.

मानवी स्वभावामध्ये दुसऱ्या व्यक्तीवर टीका करण्याची वृत्ती ही जन्मजात असते. ही वृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. मात्र, कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये जिथे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, समाजसेवी संस्था, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करीत असलेले कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचविणारे एसटी बेस्ट आणि रेल्वे स्टाफ, त्यांना जेवण पुरविणारे नागरिक, जीवनावश्यक वस्तू पुरविणारे कामगार, मीडियामध्ये काम करीत असलेले पत्रकार, शेतकरी बांधव असे अनेक समाजातील घटक या संकटाशी लढत आहेत. या कोव्हिड योद्ध्यांना धन्यवाद देणारी एखादी ओळ आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये न उच्चारणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत. तो कदाचित एक नवीन विक्रमच ठरेल, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.

मनिषा कायंदे (प्रवक्त्या, शिवसेना)

हेही वाचा - ...हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांचे खुले आव्हान

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आभासी आकडे दिले होते. या आकड्यांचा समाचार महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतला आहे, असे कायंदे म्हणाल्या. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे कोविड योध्यांचा उल्लेख करतील, अशी आम्हाला आशा होती. मात्र, त्यांनी या कोव्हिड योद्ध्यांना साधा उल्लेख न करून त्यांचा जाहीर अपमान केला आहे. यासोबतच भाजपने कोरोनासारख्या संकटात 'महाराष्ट्र बचाव' सारखे बालिश आंदोलन करून कोव्हिड योद्ध्यांना आत्मविश्वास कमी करण्याचे काम केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.