वांद्रे (मुंबई) - वांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असे वांद्रे येथील घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वांद्र्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, 'त्या' लोकांची व्यवस्था सरकारने करावी - विरोधी पक्षनेत्यांची विनंती - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती
परराज्यातून आलेल्या कामगारांची तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी.
वांद्य्रातील घटना अत्यंत दुर्दैवी