ETV Bharat / state

मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - मुंबई कोरोना अपडेट

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या २४ तासात देशात ७८ हजार ३२७ रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यासाठी आणखी चाचण्या वाढविण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

mumbai corona update  mumbai corona positive patients  mumbai corona patients death  devendra fadnavis on corona  मुंबई कोरोना पॉझिटिव्ह केसेस  मुंबई कोरोना अपडेट  कोरोनाबाबत देवेंद्र फडणवीस
मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
author img

By

Published : Sep 2, 2020, 12:31 PM IST

मुंबई - मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे.

मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या 6574 होती, ती 7709 वर गेली. ही वाढ केवळ 14 टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत 37,528 इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 इतकी झाली. ही वाढ 42 टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात 18.44 टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीपेक्षाही महाराष्ट्र मागे आहे.

भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (1584), आंध्र (1391), दिल्ली (950), तामिळनाडू (847), आसाम (748), कर्नाटक (740), बिहार (650), तेलंगाणा (637), उत्तराखंड (590), हरयाणा (563) इतकी आहे. भारताची सरासरी 545 इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (4.18 टक्के), उत्तरप्रदेश (4.56 टक्के), पंजाब (4.69 टक्के), मध्यप्रदेश (4.74 टक्के), गुजरात (5.01 टक्के), बिहार (5.44 टक्के), हरयाणा (5.51 टक्के), ओरिसा (5.71 टक्के), झारखंड (6.19 टक्के), गोवा (8.05 टक्के), तामिळनाडू (8.10 टक्के), भारताचा 8.57 टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर 19.15 टक्के इतका आहे, असे फडणवीस म्हणाले.

अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढा. सातार्‍यात खाटांची क्षमता अधिक वाढवा, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणा, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.