मुंबई - सत्ताधारी पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानासाठी विरोधकांना आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी राज्य सरकारच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र, तावडेंनी केलेल्या विनंतीला नकार देत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
यावेळी तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, आपण चहापानाच्या निमंत्रणासाठी आलो नव्हतो. तर उद्यापासून होणारे अधिवेशनातील कामकाज शांततेत आणि सामोपचाराने व्हावे, यासाठी विरोधकांनी विनंती करण्यासाठी आलो असल्याचे तावडे यांनी सांगितले. मात्र, चहापानाचा विषय काढताच तावडेंनी कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला.
विरोधी पक्षनेत्यांना कामकाजाच्या संदर्भात अधिवेशन शांततेत चालावे, अशी सत्ताधाऱयांची मागणी असते. त्यावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन विरोधी पक्षाने दिले असल्याचे तावडे यांनी सांगितले.