मुंबई - लसीकरण फ्री करावे यासाठी भाजप नगरसेवकांनी माझ्या दालनाबाहेर आंदोलन केले. राज्यात सरकारी रुग्णालयांत लसीकरण मोफत आहे. खासगी रुग्णालयांत पैसे आकारले जात आहेत. आणि आकारलेले पैसे केंद्र सरकारकडे जात आहेत. त्यामुळे, मी स्वतः केंद्राच्या विरोधात भाजप नगरसेवकांसोबत आंदोलन करीन, जर ते तयार असतील तर. त्यामुळे, भाजप नगरसेवकांनी अभ्यास करून आंदोलन करावे, अशी टीका पेडणेकर यांनी केली.
हेही वाचा - चेकनाक्यावर लाच मागणाऱ्यांना आवरा, पालिका आयुक्तांकडे मालवाहतूकदांराची तक्रार
सर्वोच्च न्यायालयाने पालिकेचे केले कौतुक
महानगर पालिकेच्या कामाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले. आम्ही जनतेच्या सेवेत आहोत. पालिकेने एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीर आणण्यास सांगितले नाही. केंद्राकडून आम्हाला लसी कमी उपलब्ध होत आहेत. लस उपलब्ध होणार नाही, तर लसीकरण बंद ठेवावे लागेल, असेही पेडणेकर म्हणाल्या.
सोसायट्यांमध्ये लसीकरणाचा मुद्दा विचाराधीन
सोसायट्यांमध्ये लसीकरण व्हावे, हे विचाराधीन आहे. मात्र, मार्गदर्शक सूचनांचे पालन होणार नसतील किंवा तशी पुर्तता होणार नसेल, तर सोसायट्यांना लसीकरणाची परवानगी मिळणार नसल्याचे देखील महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
हेही वाचा - मुंबईत तब्बल 21 कोटीचे 7 किलो युरेनियम जप्त; दोघांना अटक