ETV Bharat / state

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात उसळी, रुपयाही वधारला

निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाल्याने सेन्सेक्स २९,३१६.८० अंशांवर तर निफ्टी ८,५२९.३५ अंशांवर जाऊन पोहोचले. रिलायन्स समूह, इन्फोसिस, एचडीएफसीचे दोन्ही शेअर्स चढे राहिल्याने बाजारात तेजीचे चित्र दिसून आले.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Mar 31, 2020, 12:57 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना दिलासादायक चित्र दिसले. बाजार खुला होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५०० अंशांची उसळी घेतली. तर राष्ट्रीय बाजाराच्या निर्देशांकामध्येही २४८ अंशांची वाढ झाली.

निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाल्याने सेन्सेक्स २९,३१६.८० अंशांवर तर निफ्टी ८,५२९.३५ अंशांवर जाऊन पोहोचले. रिलायन्स समूह, इन्फोसिस, एचडीएफसीचे दोन्ही शेअर्स चढे राहिल्याने बाजारात तेजीचे चित्र दिसून आले.

टाटा स्टील, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, एम अँड एम, रिलायन्स समूह, ओएनजीसी, आयटीसी, एचसीएल टेक आणि टायटन यांचे शेअर तीन टक्क्यांनी वधारले. तर दुसऱ्या बाजूला इंडुसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो आणि मारुती यांचे शेअर घसरले.

जागतिक बाजारातही तेजी

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर चीनमध्ये पुन्हा उद्योगधंदे सुरू होत आहेत. त्यामुळे शांघाय शेअर बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. चीनमधील ९८ टक्के महत्वाचे उद्योग पुन्हा त्यांचे उत्पादन सुरू करत आहेत.

भारतीय रुपयाही आज मजबूत झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत दहा पैशांची वाढ होऊन रुपया ७५.४८ च्या स्तरावर पोहोचला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.