मुंबई - कांद्याच्या वाढत्या भावामुळे कांदाभजी अनेकांच्या मेनुकार्डमधून गायब झाल्याचे चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळते आहे. कांद्याचे भाव 150 रुपये किलो झाल्याने स्टॉल टाकून वडापाव, भजी विक्रेत्यांना कांदा घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी कांदी भजी ठेवण्याचे बंद केले आहे.
कांद्याचे दर वाढल्याने अनेकांच्या मेनुतून कांदा भजी गायब कांद्याचा दर १५० रुपये किलो झाल्याने अनेकांच्या संसाराचे बजेट कोडमडले आहे. उपाहारगृहामध्ये यापूर्वी २५ रुपये दराने एक प्लेट कांदा भजी विकली जात होती. मात्र, आता खवय्यांना एक प्लेट कांदा भजीसाठी 30 ते 35 रुपये मोजावे लागत आहेत. प्रभादेवी येथील सारंग बंधूचे नंदकिशोर तळाशिलकर यांनी सांगितले की, कांद्याचे दर वाढले तरी कांदाभजी आम्हाला तयार करावी लागते. कारण गिऱ्हाईक तोडायचे नाही. आम्ही 5 रुपयाने दर वाढवला आहे. तरी पहिल्यापेक्षा कांदाभजी कमी प्रमाणात तळतो.
आम्ही कांदाभजी विकायचो. कांद्याचे दर प्रचंड वाढल्याने कांदाभजी विकणे बंद केले आहे. कांद्याने घरचे आणि व्यवसायाचे बजेट बिघडले आहे. लवकर दर कमी व्हावा असे आम्हाला वाटत, असल्याच्या प्रतिक्रिया छोटे हॉटेल व्यावसायिक देत आहेत.