ETV Bharat / state

Mumbai Crime News : डार्कनेटच्या सहाय्याने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड, एक कोटींच्या ड्रग्स जप्तीसह एका नायजेरियन व्यक्तीस अटक - ड्रग्जची तस्करी

एनसीबी मुंबई विभागाने डार्कनेटच्या सहाय्याने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. 996 ग्रॅम (अंदाजे 2000 गोळ्या) MDMA हा अमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. जॉन संडे असे या व्यक्तीचे नाव आहे. नालासोपारा येथून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.

Mumbai Crime News
नायजेरियन व्यक्तीला अटक
author img

By

Published : Jun 27, 2023, 7:54 PM IST

ड्रग्जची तस्करी करताना व्यक्तीला ताब्यात घेतले

मुंबई : मुंबईत आता अमली पदार्थांचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने मोठी कामगिरी केली आहे. 20 जूनला फॉरेन पोस्ट ऑफिस मुंबई येथून 996 ग्राम (अंदाजे 2000 गोळ्या) MDMA जप्त करण्यात एनसीबीला यश मिळाले होते. नेदरलँड्समधून आलेले ड्रग्ज कॅनमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा कारवाईमुळे 26 जून नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या नायजेरियनवर यापूर्वी एनसीबी मुंबईने गुन्हा दाखल केला होता. जप्त केलेले ड्रग्ज डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सी पेमेंटद्वारे मागवले होते. ड्रग्जच्या खरेदीसाठी वापरलेली बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी : सखोल तपासानंतर एनसीबी मुंबईने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटला मोठा दणका दिला आहे. ज्यामध्ये फॉरेन पोस्ट ऑफिस मुंबई येथून एका पार्सल खेपातून एकूण 996 ग्रॅम MDMA वजनाच्या सुमारे 2000 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. डार्कनेटद्वारे ऑर्डर केलेल्या अंमली पदार्थांच्या खरेदीमध्ये आफ्रिकन सिंडिकेटचा सहभाग होता, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार विविध गुप्तचर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

एकूण 2000 गोळ्या आढळल्या : नेदरलँडमधून टिन कॅनमध्ये लपवून पार्सल मोडद्वारे औषधांची एक खेप मागवण्यात आली. त्यानुसार विविध ड्रॉप पॉइंट्सवर करडी नजर ठेवण्यात आली होती. 20 जूनला फॉरेन पोस्ट ऑफिस, मुंबईकडून एका पार्सलमधील सामग्रीबद्दल एनसीबीला माहिती देण्यात आली. पार्सल उघडले असता, गुलाबी, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या सुमारे 2000 गोळ्या आढळल्या. त्या गोळ्यांची तपासणी केली असता, त्या MDMA असल्याचे आढळून आले. ज्याचे वजन एकूण 996 ग्रॅम आहे. हे पार्सल मागवणाऱ्याच्या शोधासाठी तपास सुरू करण्यात आला.

बनावट भारतीय पासपोर्ट सापडले : 26 जूनला नालासोपारा येथे जॉन संडे नावाच्या आफ्रिकन नागरिकाची ओळख पटली. एनसीबीच्या अधिका-यांच्या पथकाने सापळा तयार करून त्याला अटक केली. तसेच घराची झडती घेतली असता, त्याच्या बनावट फोटेसह बनावट भारतीय पासपोर्ट देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले. चौकशीदरम्यान जॉनने कबूल केले की, त्याने हे ड्रग्ज दिल्ली, मुंबई, गोवा आणि इतर शहरांमध्ये वितरणासाठी आणले होते.

बेकायदेशीर ड्रग्ज बाजारातून खरेदी केले : जॉनने असेही सांगितले की, सध्या सुरू असलेल्या कडक दक्षतेच्या पार्श्‍वभूमीवर, सणासुदीच्या प्रारंभी बेकायदेशीर ड्रग सर्किटमध्ये वितरीत होणार्‍या भागांमध्ये ड्रग्ज खरेदी करण्याचा कट त्यांनी आखला होता. त्याच्या ताब्यातून जप्त केलेला भारतीय पासपोर्ट त्याने पार्सल बुक करण्यासाठी जाणीवपूर्वक बनावट बनवले होते. जप्त केलेले ड्रग्ज डार्कनेट सहाय्याने बेकायदेशीर ड्रग्ज बाजारातून खरेदी केले गेले होते. ज्यासाठी क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे दिले गेले होते. जॉन परदेशातील काही प्रमुख ड्रग्ज हँडलर्सच्या संपर्कात होता. एनसीबीला असेही कळले की, जॉनवर यापूर्वी 2021 मध्ये एनसीबी-मुंबईने गुन्हा दाखल केला होता. तो सध्या जामिनावर बाहेर होता. संपूर्ण भारतातील त्याच्या स्थानिक सहकाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा -

  1. Pakistani Drone in Amritsar : ड्रग्जची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन पुलमोरा सीमारेषेवर सुरक्षा जवानांनी पाडले
  2. Mumbai Crime News: मालवणी पोलिसांची मोठी कामगिरी; अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या नायजेरियनला रंगेहात अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.