ETV Bharat / state

धारावीत 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, मृतांचा आकडा 4वर - कोरोना बातमी

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आज एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झाेलेला हा धारावीत चौथा मृत्यू आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2020, 4:32 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा धोका वाढत चालला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा रोज मृत्यू होत आहेत. आज कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील डॉ. बालिगा नगर येथे राहणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने यामुळे धारावीतील मृतांची संख्या 4 वर पोहचली आहे.

धारावीत कोरोनाचे रोज नवे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वरळीनंतर धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. धारावीत कोरोनाचे एकूण 28 रुग्ण आढळून आले आहेत. येथील डॉ. बलिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवाडा चाळ, सोशल नगर, जनता कॉलनी, कायलन वाडी, पीएमजीपी कॉलनी, मुर्गन चाळ आदी भागात तसेच दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले तबलिगी समाजाचे लोक यांचा रुग्णांमध्ये समावेश आहे.

आतापर्यंत डॉ. बालिगा नगरमध्ये 1, सोशल नगरमध्ये 1 आणि कायलन वाडी येथे एक मृत्यू झाला आहे. त्यात आज डॉ. बालिगा नगरमध्ये 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने धारावीतील मृतांचा आकडा 4वर पोहचला आहे. धारावीत अत्यंत दाटीवाटीच्या झोपड्या असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. माहीम फाटक, आंध्रा वॅली रोड, धारावी-माहीम रोड, धारावी क्रॉस रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, कटारिया मार्ग, एकेजी नगर, मदिना नगर, चित्रनगरी आदी भाग बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा - #coronavirus : धारावीत स्क्रिनिंग सुरू; दहा ते बारा दिवसांत संपूर्ण धारावीचे स्क्रिनिंग पूर्ण करण्याचे लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.