मुंबई - मालाड येथे झाडाची फांदी पडल्याने एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शैलेश मोहनलाल राठोड, असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
मालाड नारियलवाला कॉलनी येथे झाडाची फांदी पडल्याने शैलेश हे जखमी झाले होते. दरम्यान, त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.