ETV Bharat / state

डाक विभागातील कोरोनाबाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत - डाक विभाग महाराष्ट्र व गोवा परिमंडळ बातमी

डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या रकमेत स्वत:चे ७५ हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील करोनाबाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेल्फेअर फंडाला दिली.

डाक विभागातील करोना बाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत प्रदान

author img

By

Published : Jun 23, 2020, 5:14 PM IST

मुंबई - डाक विभागातील करोनाबाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले. राज्याचे मुख्य पोस्टमास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपयांचा धनादेश स्व‍ीकारला. यावेळी सहाय्यक पोस्टमास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखी‍ल उपस्थित होते.

डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या रकमेत स्वत:चे ७५ हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील करोनाबाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेल्फेअर फंडाला दिली. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेश‍ीय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.