मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी (९ एप्रिल) मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील ६ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ९३ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. यानुसार या ६ मतदारसंघांसाठी एकूण १५६ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी आज (१० एप्रिल) करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धी माध्यम कक्षाद्वारे देण्यात आली आहे.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २२ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण ३३ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत.
तसेच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी अर्ज भरले. तर आजपर्यंत ३० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी तर आतापर्यंत १७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. आज या अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननी दरम्यान काही अर्ज बाद होतील, तर जे बाद होणार नाहीत त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केल्यावर प्रचाराला वेग येणार आहे. मुंबईमधून एकूण १५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ९३ अर्ज दाखल झाले आहेत.
शहर जिल्ह्यातून एकूण ३७ अर्ज
- दक्षिण १७
- दक्षिण मध्य २०
उपनगर जिल्ह्यातून एकूण १०९ अर्ज
- उत्तर २२
- उत्तर पश्चिम २७
- उत्तर पूर्व ३३
- उत्तर मध्य २७