ETV Bharat / state

विशेष : मुंबईने ओलांडला एक कोटी लसीकरणाचा टप्पा, लसीकरणात पुरुषांची संख्या अधिक - मुंबई कोरोना बातमी

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा गेले दीड वर्षे प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. गेल्या साडे आठ महिन्यात मुंबईने एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारीपर्यंत (दि. 4 सप्टेंबर) 1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 58 लाख 17 हजार 281 पुरुषांना तर 44 लाख 20 हजार 226 महिलांना लस देण्यात आली आहे.

म
author img

By

Published : Sep 4, 2021, 9:58 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा गेले दीड वर्षे प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. गेल्या साडे आठ महिन्यात मुंबईने एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारीपर्यंत (दि. 4 सप्टेंबर) 1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 58 लाख 17 हजार 281 पुरुषांना तर 44 लाख 20 हजार 226 महिलांना लस देण्यात आली आहे.

1 कोटी लसीचा टप्पा ओलांडला

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारच्या कोव्हिन ऍपवरील नोंदी प्रमाणे 4 सप्टेंबरला महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारची 337, तर खासगी 202 अशी एकूण 549 केंद्रांवर 1 लाख 78 हजार 879 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामुळे मुंबईने साडेआठ महिन्यात एक कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत एकूण 1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यात 73 लाख 6 हजार 648 लाभार्थ्यांना पहिला तर 29 लाख 33 हजार 217 लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

पुरुषांची संख्या अधिक

1 कोटी 2 लाख 39 हजार 865 लाभार्थ्यांपैकी 58 लाख 17 हजार 281 पुरुषांना तर 44 लाख 20 हजार 226 महिलांना लस देण्यात आली आहे. 18 ते 44 वयातील 52 लाख 57 हजार 541, 45 ते 60 वर्षामधील 30 लाख 45 हजार 688 तर 60 वर्षांवरील 19 लाख 36 हजार 636 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत कोव्हिशिल्डचे 92 लाख 79 हजार 929, कोवॅक्सिनचे 9 लाख 26 हजार 248 तर स्फुटनिक व्हीचे 33 हजार 688 डोस देण्यात आले आहेत.

सर्वाधिक लसीकरण 'या' दिवशी

कोव्हिन ऍपवरील नोंदी प्रमाणे आज 4 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 लाख 78 हजार 879 लसीचे डोस देण्यात आले. त्याआधी 27 ऑगस्ट रोजी 1 लाख 77 हजार 17, 21 ऑगस्ट रोजी मुंबईत 1 लाख 63 हजार 775, 14 ऑगस्टला 1 लाख 53 हजार 331 तर 23 ऑगस्ट रोजी 1 लाख 53 हजार 881 लसीचे डोस देण्यात आले.

लसीकरण मोहीम

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचारी, जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वयोगटातील, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने 19 मे ला घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने 25 मे पासून स्तनदा मातांचे आणि गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू केले आहे. परदेशात जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, जेलमध्ये असलेले कैदी, तृतीयपंथी, मानसिक रुग्ण आदींचे लसीकरण केले जात आहे. ऑलम्पिक खेळाडूंचेही लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : मृत्यूसंख्या किंचित घटली; शनिवारी ४१३० रुग्णांची नोंद तर ६४ बाधितांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.