ETV Bharat / state

Fraud of 71 Lakh : स्मशानभूमीचे टेंडर देण्याचे आमिष दाखवत ७१ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल - बाजारपेठ पोलीस

कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला स्मशानभूमीच्या देखभालीचे टेंडर ( Crematorium Tender ) मिळवून देण्याचे आमिष दाखवत ७१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 24, 2022, 4:19 PM IST

Updated : Apr 24, 2022, 9:02 PM IST

ठाणे - स्मशानभूमीच्या देखभालीचे टेंडर मिळवून ( Crematorium Tender ) देण्याचे आमिष दाखवत एकाने ७१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सोहेल सईद बुरहान (वय २८ वर्षे, रा.कौसा, मुंब्रा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

टेंडरमध्ये मोठा आर्थिक फायदा असल्याचे दाखवले आमिष - कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५४ वर्षीय तक्रारदार महिला राहते. त्यांचा वॉटर सप्लायचा व्यवसाय असून त्यांची २०१७ पूर्वी सोहेलशी ओळख झाली होती. त्यानंतर सोहेलने विश्वास संपादन करून तक्रारदार महिलेला नवीमुंबई महापालिका हद्दीतील स्मशानभूमीच्या देखभालीचे टेन्डरमध्ये भागीदार करण्याचे व त्यातून मोठा आर्थिक फायदा असल्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून तक्रारदार महिलेने २७ जुलै, २०१७ ते २८ मे, २०१९ दरम्यान भागीदार म्हणून सोहेलला टेंडर मिळवून देण्यासाठी ७१ लाख १५ हजार रुपयांची रक्कम दिली.

रक्कम परत करण्यास टाळाटाळ - अनेक महिने उलटूनही दिलेल्या रक्कमेनंतरही टेंडर दिले नाही. तसेच दिलेली रक्कम ही परत न करता तक्रारदार महिलेला सोहेल टाळाटाळ करीत होता. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजात महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सोहेल विरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

हेही वाचा - प्रेमसंबंधाच्या संशयातून ठार मारण्याच्या धमकीने तरुणाची आत्महत्या, आरोपीस अटक

Last Updated : Apr 24, 2022, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.