मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. रविवारी (२३ ऑगस्ट) मोठ्या भक्तीभावाने दीड दिवसांच्या बाप्पाना भक्तांनी निरोप दिला. नैसर्गिक व कृत्रिम अशा विसर्जन स्थळांवर काल रात्री 9 वाजेपर्यंत 31 हजार 255 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 17 हजार 764 मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. मुंबईत रात्री उशिरा किंवा सकाळी पहाटे पर्यंत विसर्जन सुरू असते.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शनिवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचे आदरातीथ्य केल्यावर रविवारी जड अंतःकरणाने भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत 31 हजार 255 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात 621 सार्वजनिक तर 30 हजार 634 घरगुती मूर्तींचा समावेश आहे. त्यापैकी 17 हजार 764 मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. विसर्जना दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद -
मुंबईत रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत दीड दिवसाच्या 31 हजार 255 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 17 हजार 764 मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. कृत्रिम तलावात सार्वजनिक 472 तर घरगूती 17 हजार 292 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करत नागरिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. प्रशासनाकडूनही योग्य ती काळजी घेतली जात आहे.