ETV Bharat / state

बाप्पा मोरया..! कलम ३७० वर परभणीत सजीव देखावा सादर - आढावा

देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानिमित्त राज्यभरातील काही महत्वाच्या गणपतींचा हा आढावा.

बाप्पा मोरया
author img

By

Published : Sep 10, 2019, 2:17 PM IST

  • अलीकडच्या काळात 370 कलम हटविण्यावरून जम्मू-काश्मीरचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. याच बहुचर्चित विषयावर परभणीतील जय हिंद गणेश मंडळाने 'कश्मीर काल आज आणि उद्या' या विषयावर सजीव देखावा सादर केला आहे. यातून जम्मू-काश्मीरची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी होती आहे.
    बाप्पा मोरया
  • पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या १२६ व्या वर्षानिमित्त भव्य तीर्थंकर जैन मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. यंदा मंडई मंडळाची शारदा गजाननाची मूर्ती यामध्ये विराजमान करण्यात आली आहे. अहिंसा परमो धर्म आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी यंदा जैन बांधवांना गणेशोत्सवात सहभागी करुन घेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पुण्यातील जैन बांधवांनी एकत्र येत विश्व शांतीसाठी नवकार मंत्राचा जप केला. हजारोंच्या संख्येने जैन बांधव यावेळी उपस्थित होते.
  • पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पा समूह गणेशोत्सवाच्या दहा दिवसात भक्तांकडून बाप्पाला वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो. पुण्यातील एका भक्ताकडून दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 175 किलोचा मोतीचूर लाडूचा नैवद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण करण्यात आला. हा महाकाय लाडु 48 तासात बनवण्यात आला आणि त्यासाठी 6 कारागिरांनी काम केले.
  • ठाण्यातील वाघबीळ गावातील साजेश मोहन पाटील या तरुणाने इस्रो (भारतीय अवकाश संशोधन संस्था) च्या कार्याला मानवंदना देण्याच्या उद्देशाने घरच्या देवा समोर GSLV Mark III यानाच्या प्रतिकृती उभारल्या आहेत.साजेश पाटील यांच्या घरी मागील 33 वर्षांपासून गणपती बसविला जातो आणि दरवर्षी सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते.
  • वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील श्रीमंत बालहौसी गणेश मंडळाने पर्यावरण पूरक धाग्यापासून 8 फुटांची इको फ्रेंडली बाप्पाची मुर्ती साकारली आहे. या इको फ्रेंडली बाप्पाला बघण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून या मंडळाचे कौतुक केले जात आहे.
  • यवतमाळच्या दारव्हा येथील ओम गणेश मंडळ, अंबिका नगर दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारा देखावा सादर करतात. यावर्षी गणेशोत्सवातून झाडे लावा झाडे जगवा संदेश देण्यात आला आहे. मागील पाच वर्षात शेतकरी आत्महत्या, दारुबंदी, दहशतवाद, सावकारी जाचाचा बळी ठरलेला शेतकरी, बेटी बचाव बेटी पढाव, वृद्धाश्रम असे सामाजिक संदेश देणारे विलोभनीय देखावे सादर केले होते. या वर्षी सुद्धा "झाडे लावा झाडे जगवा" एक नविन सामाजिक उपक्रम घेऊन ओम गणेश मंडळ आले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.