मुंबई - सध्या भाजप सरकारकडून राज्यघटनेतल्या मुलभूत तत्वांना सुरुंग लावण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी संविधानाची तत्वे पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनादिनी २८ डिसेंबरला संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. हा काळ देशाच्या इतिहासातील अत्यंत वाईट काळ असल्याचेही थोरात म्हणाले.
ऑगस्ट क्रांती मौदान ते गिरगार चौपाटीपर्यंत रॅली
२८ डिसेंबरला काँग्रेसची मुंबईत संविधान बचाव रॅली निघणार आहे. सकाळी १० वाजता ऑगस्ट क्रांती मैदानापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली गिरगाव चौपाटीपर्यंत निघणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेत घेऊनी यांची माहिती दिली.
देशात सध्या संविधानची तत्वांना न जुमानत कायदे केले जात आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठी हल्ला केला जात आहे. त्यामुळे आम्ही संविधान बचाव रॅली काढणार असल्याचे थोरात म्हणाले.
सत्तेचा रिमोट पवारांच्या हाती नाही
महाविकास आघाडीच्या सत्तेचा रिमोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हाती आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी केल्यावर थोरात म्हणाले की, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण आमचे ३ पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही सगळे निर्णय एकत्र बसून घेतो. ज्यावेळी ३ पक्षाचे सरकार असते त्यावेळी समान न्याय पद्धतीने जावे लागते. त्यामुळे पवारांच्या हाती सत्तेचा रिमोट म्हणणे चुकीचे असल्याचे थोरात म्हणाले.