मुंबई - २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोइंगपटू दत्तू भोकनळविरोधात यावर्षी मे महिन्यात पत्नीने गुन्हा दाखल केला होता. याविरोधात दत्तू भोकनळ याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
पत्नीने दत्तूवर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार कलम ४९८(ए)/420 नुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. भारताचा अव्वल रोइंगपटू दत्तू भोकनळ याची पत्नी नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून आपल्या पतीने गेल्या काही वर्षांपासून आपला मानसिक व शाररीक छळ केल्याचे तिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा
आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात कथित पत्नीची तक्रार, शारीरिक मानसिक छळाचा गुन्हा दाखल