ETV Bharat / state

बोगस ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एकाला अटक - मुंबई लॉकडाऊन न्यूज

एका जिल्हामधून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक आहेत. हे पास मुंबई पोलिसांकडून ऑनलाइनपद्धतीने दिले जातात. मात्र, काही दलाल 300 ते 400 रुपये घेऊन बोगस ई-पास बनवून देत होते.

बोगस ई- पास
bogus-e-pass
author img

By

Published : May 21, 2021, 11:08 AM IST

Updated : May 21, 2021, 12:51 PM IST

मुंबई- डी.एन.नगर परिसरात बोगस ई-पास विकणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अमीर इमतियाज मुंशी (३१) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून काही बोगस ई-पास आणि बनावट साहित्याचे सामान जप्त करण्यात आले आहे.

बोगस ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

300 ते 400 रुपये घेऊन बोगस ई-पास

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "ब्रेक द चैन" मोहीमेअंतर्गत लॉकडाउन जाहीर केला गेला आहे. त्यामुळे एका जिल्हामधून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक आहेत. हे पास मुंबई पोलिसांकडून ऑनलाइनपद्धतीने दिले जातात. मात्र, काही दलाल 300 ते 400 रुपये घेऊन बोगस ई-पास बनवून देत होते. या प्रकरणाची माहिती मिळताच डी.एन.नगर पोलिसांनी छापा टाकत बोगस ई-पास विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने या लॉकडाऊन काळामध्ये किती नागरिकांना अशा पद्धतीने बोगस ई-पास बनवून दिले आहेत याचा तपास डी.एन.नगर पोलीस करत आहेत.

Last Updated : May 21, 2021, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.