ETV Bharat / state

अभिनेता इरफान खान काळाच्या पडद्याआड, वयाच्या ५३ व्या वर्षी घेतली 'एक्झिट' - अभिनेता इरफान खान काळाच्या पडद्याआड

अभिनेता इरफान खान यांचे आज निधन झाले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Irrfan Khan passing away
अभिनेता इरफान खान यांचे निधन
author img

By

Published : Apr 29, 2020, 12:10 PM IST

Updated : Apr 29, 2020, 2:07 PM IST

मुंबई - आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे इरफानला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी इरफानने अचानक एक्झिट घेतली.

  • Actor Irrfan Khan passes away at Kokilaben Hospital in Mumbai while battling a rare cancer. He was surrounded by his family as he breathed his last: Statement pic.twitter.com/Ca4BcmE9KR

    — ANI (@ANI) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगग्रस्त होते. त्यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचारही घेतले होते. उपचार घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा भारतात दाखल झाले. मात्र, काल पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 'लाइफ इन अ मेट्रो', 'पानसिंग तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'गुंडे', 'पिकू', 'तलवार', 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. आपल्याला हा दुर्धर आजार झाल्याची बातमी स्वतः इरफान खाननेच 2 मार्च 2018 रोजी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपल्या फॅन्सना दिली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इरफान यांची आई सईदा बेगम यांचे निधन झाले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे इरफान हे आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. इरफान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या आईच अंत्यदर्शन घेतले होते. त्यावेळीही त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी अंत्यविधीला जाण्याचे टाळल्याची चर्चा रंगली होती.

Last Updated : Apr 29, 2020, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.