ETV Bharat / state

Growth in UTS App Users : युटीएस ॲपचा वापरकर्त्यां प्रवाशांची संख्या वाढली, फर्स्ट क्लाससह एसीचे तिकीट काढता येणार

तिकिटाच्या रांगांपासून वाचवण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी युटीएस ॲप सुरू करण्यात आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या ॲपवरून टिकट काढणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी तर मागील वर्षीच्या जानेवारी २०२२ च्या तुलनेत २६५ टक्क्यांनी वाढली आहे. या ॲपवरून फर्स्ट क्लास आणि एसी लोकलचे प्रवासी आता एका तिकिटात ४ प्रवाशांचे तिकिटे बुक करू शकतात, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

author img

By

Published : Jan 29, 2023, 8:21 PM IST

Growth in UTS App Users
युटीएस ॲप

मुंबई : मुंबईमध्ये ७० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचे तिकट आणि पास काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी एका प्रवाशाला अर्धा ते पाऊण तास रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम मशीन बसवल्या. तसेच युटीएस ॲप सुरू केले. गेल्या काही वर्षांत युटीएस ॲपचा वापर वाढू लागला आहे. मध्य रेल्वेने युटीएस मोबाइल तिकीट वापरून डिजिटल आणि पेपरलेस बुकिंगसाठी विविध माध्यमांतून जोर दिल्याने डिजिटल तिकीटिंगमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये ७४.३९ लाख टिकिटांची विक्री झाली होती. डिसेंबर २०२२ मध्ये १.३५ कोटी प्रवासी तिकिटे विक्री झाली आहे. एकूण बुकिंगमध्ये हे प्रमाण ११.६१ टक्के होते. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात जानेवारी २०२२ मध्ये यूटीएस ॲप वापरून तिकिटे बुक करण्याऱ्या प्रवाशांची संख्या ३७.१४ लाख होती, जी डिसेंबर २०२२ मध्ये १.३५ कोटी झाली त्यामध्ये २६५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

युटीएस ॲप हिंदी, इंग्रजीमध्ये : उपनगरीय विभागासाठी, तिकीट बुकिंगसाठीचे अंतराचे निर्बंध सध्याच्या २ किमी वरून वाढविण्यात आले आहे. सर्व संबंधित क्षेत्रिय रेल्वेसाठी ५ किमी असे निश्चित केले होते. त्यानंतर दि. १० जानेवारी, २०२३ पासून ५ किमीचे हे निर्बंध १० किमी पर्यंत वाढविण्यात आले आहे. वापरकर्ते आता उपनगरीय स्थानकांसाठी स्त्रोत स्टेशनपासून १० किमीच्या परिघात यूटीएस तिकिटे बुक करू शकतात. या शिथिलतेमुळे यूटीएस तिकिटांची निवड करणाऱ्या प्रवाशांच्या वाढीला मोठी चालना मिळाली आहे. कारण बहुतांश कार्यालये, कंपन्या इत्यादी स्थानकांपासून ५ - १० किमीच्या परिघात येतात. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांची कार्यालये, कंपन्या इत्यादींमध्ये बसून तिकिटे बुक करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे जाताना तिकीट बुक करण्यासाठी शेवटच्या क्षणी त्रास होण्याची गरज राहणार नाही. वरील वैशिष्ट्यांमध्ये आणखी वाढ करत आता युटीएस ॲप हिंदी आणि इंग्रजीसह मराठी भाषेतही उपलब्ध करण्यात आले आहे.

यूटीएस ॲपची नवीन वैशिष्ट्ये: 1) मुंबई उपनगरासाठी अनेक सीझन तिकिटांचे नूतनीकरण केले जाऊ शकते किंवा जारी केले जाऊ शकते. फील्डवर काम करणार्‍या प्रवाशांना वेगवेगळ्या स्त्रोत स्टेशनपासून वेगवेगळ्या गंतव्यस्थानापर्यंत एकापेक्षा जास्त मार्गांनी प्रवास करणे आवश्यक आहे. आता, वापरकर्ते एकाधिक सीझन तिकिटांचा लाभ घेऊ शकतात.
2) यापूर्वी, पेपरलेस सीझन तिकिटांची वैधता दुसऱ्या दिवसापासून सुरू होती. नवीन जारी केलेल्या वैशिष्ट्यासह, वापरकर्ता जर भू-कुंपण (निर्बंधित) क्षेत्राच्या बाहेर उभा असेल तर त्याच दिवसापासून वैधतेसह पेपरलेस सीझन तिकिटे बुक करू शकतात.
3) उपनगरीय विभागात असलेली स्थानके निवडण्यासाठी उपनगरी म्हणून डिफॉल्ट पर्याय असण्याची तरतूद: - उपनगरी विभागातील डिफॉल्ट पर्याय वापरकर्त्यासाठी स्त्रोत आणि गंतव्य स्थाने निवडण्यासाठी सोयीस्कर बनवतो कारण केवळ उपनगरीय विभागात येणारी स्थानके फिल्टर केली जातात आणि वापरकर्त्यास दृश्यमान केली जातात.
4) उपनगरी नसलेल्या विभागासाठी, सर्व विभागीय रेल्वेसाठी सध्याच्या ५ किमीवरून २० किमीपर्यंत तिकीट बुकिंगसाठी अंतर मर्यादा वाढविण्यात आली आहे.
5) गैर-उपनगरीय स्थानकांसाठी वापरकर्ते आता ते स्त्रोत स्टेशनपासून २० किमीच्या परिघात असतील तेव्हा ते यूटीएस तिकिटे बुक करू शकतात.

हेही वाचा : Engineering Aspirant Fell From Hostel Balcony: राजस्थानात महाराष्ट्रातील विद्यार्थी पाचव्या मजल्यावरून पडला.. जेईईची करत होता तयारी, गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.