ETV Bharat / state

जेव्हीएलआर रस्ता खचल्याने वाढतेय अपघातांचे प्रमाण; प्रशासनाचे दुर्लक्ष

जोगेश्वरी ते गांधीनगरकडे जाणाऱ्या जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे बेरिकेटस लावून वाहनांना पर्यायी डांबरी रस्ता बनवून दिला आहे. हा रस्ता सध्या अपघात प्रवण बनला आहे. रस्त्यावर खड्डे आणि रस्ता खचल्याचे उघडपणे दिसत असताना संबंधित प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने, वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Road
रस्ता
author img

By

Published : Jul 4, 2020, 6:14 PM IST

मुंबई: जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोड(जेव्हीएलआर)वरील आयआयटी पवई ते गांधीनगर एलबीएस मार्गाला जोडणारा संपूर्ण रस्ता खचला आहे. मागील दीड महिन्यापासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने येथील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

जेव्हीएलआर रस्ता खचल्याने वाढतेय अपघातांचे प्रमाण

जोगेश्वरी ते गांधीनगरकडे जाणाऱ्या जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे बेरिकेटस लावून वाहनांना पर्यायी डांबरी रस्ता बनवून दिला आहे. लॉकडाऊन काळात या मार्गावर काम बंद होते आणि वाहनांची वर्दळही कमी होती. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हीएलआरवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जेव्हीएलआर हा मुख्य मार्ग असून तो पूर्व द्रुतगती मार्ग व पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडला जातो. सिप्झ, साकीनाकाचे मार्गावरील वाहनेही याच जेवीएलआरवरून मार्गस्थ होतात. मात्र, या वर्दळीच्या रस्त्यांकडे प्रशासनाने योग्य वेळी लक्ष न दिल्याने जेवीएलआर रस्ते अपघात प्रवण क्षेत्र बनत चालले आहे. रस्त्यावर खड्डे आणि रस्ता खचल्याचे उघडपणे दिसत असताना संबंधित प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने, वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

लॉकडाऊन आणि मिशन बीगिन अगेनच्या कामात प्रशासनाच व्यस्त आहे. या कंत्राटदार फायदा घेत असल्याचे समोर येत आहे. जेव्हीएलआर लवकरच दुरुस्त करा, अन्यथा 'रस्ता खोदो' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पवईतील सामाजिक कार्यकर्ते जॉली मोरे यांनी दिला आहे.

दरम्यान, मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते निसरडे झाले आहेत. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गांधीनगर उड्डाणपुलाजवळ टेम्पो उलटल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातग्रस्त टेम्पो पवईवरून ठाण्याच्या दिशेला जात होता. या घटनेत चालक थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी सदर टेम्पो बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.