मुंबई : Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियन तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राशिद खान यांनी आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावं, असा इशारा राशिद खान यांनी दिला आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
19 हजार 750 कोटींची नोटीस : राशिद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार त्यांनी आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस सुशांत सिंह राजपूत तसंच दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणी जारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच आदित्य ठाकरे यांना सीबीआयनं ताब्यात घेऊन चौकशी करावी, असं देखील याचिकेत म्हटलं आहे.
प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती : आदित्य ठाकरेंच्या याचिकेवर राशिद खान यांनी नवा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं त्यांनी आता याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यामुळं मूळ याचिका, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेली हस्तक्षेप याचिकेवर या आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मागील सुनावणीत कॅव्हेट दाखल केली आहे. कोणतेही निर्देश देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला केली आहे.
तिथं मोबाईल कसा आहे? : आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात खोटी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा अवमान झाला असून, आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केली आहे. यावेळी राशिद खाननं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा त्या भागात आदित्य ठाकरेंच्या मोबाईलचं लोकेशन होतं? असा सवाल यावेळी करण्यात आला. दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास अद्याप संपलेला नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा -
- Aaditya Thackeray Bombay HC : सुशांत सिंह, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची हायकोर्टात धाव, वाचा काय आहे प्रकरण?
- Maharashtra Politics : आदित्य ठाकरे अडचणीत येणार? शिंदे गटात सहभागी होताच राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
- Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा