ETV Bharat / state

सेनेला दिलेली मुदत संपली मात्र; सत्ता स्थापनेचा दावा कायम, काँग्रेस राष्ट्रवादीचा निर्णय नाहीच

शिवसेना दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे. शिवसेनेला राज्यपालांनी आज (सोमवार) ७ वाजून ३० मिनिटांपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अद्यापही निर्णय न झाल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.

author img

By

Published : Nov 11, 2019, 8:24 PM IST

Updated : Nov 11, 2019, 8:38 PM IST

शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा कायम

मुंबई - शिवसेना दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे. शिवसेनेला राज्यपालांनी आज (सोमवार) ७ वाजून ३० मिनिटांपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अद्यापही निर्णय न झाल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. असे असले तरी शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा कायम ठेवला असल्याची माहिती युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी दिली. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडणार आहेत.

राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आज ७ वाजून ३० मिनिटापर्यंतची वेळ दिली होती. त्यानुसार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांनी सत्ता स्थापनेसाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. मात्र, शिवसेनेची ही मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली आहे. असे असताना अद्यापही सेनेने सत्ता स्थापनेचा दावा कायम ठेवला आहे.

mumbai
शिवसेनेला दिलेली मुदत संपली, राज्यपालांनी सेनेला मुदत नाकारली

आज काँग्रेसची दिल्लीत सोनिया गांधी यांच्याबरोबर बैठक झाली. मात्र, त्यामध्ये ठोस काहीही निर्णय झाला नाही. राष्ट्रवादीनेही अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, तसे सध्या काहीही झाले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चा सुरु आहे. मात्र, सत्तेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Nov 11, 2019, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.