मुंबई - महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत घडत असलेल्या घडामोडी दिवसेंदिवस अधिक नाट्यमय होत आहेत. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा पेच सोडवता न आल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुनर्निवडणूक झाल्यास फुटलेल्या उमेदवाराविरोधात तीन पक्ष एकत्र असतील कुणी माईचा लाल असला तरी निवडून योणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा - आमदार रवी राणांचा व्हिडिओ व्हायरल,शरद पवारांना केली भाजपला पाठिंबा देण्याची विनंती
राष्ट्रपती राजवटीनंतरही युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्याने जुळवाजुळव सुरूच आहे. सत्तास्थापनेबाबत निर्णय घेण्यासाठी आज पुन्हा एकदा राष्ट्रवाीदीच्या नेत्यांची बैठक होत आहे. यावेळी, आमदारांच्या फोडाफोडीबद्दल विचारले असता अजित पवार यांनी एकही आमदार फुटला तर तो पुन्हा निवडून येणार नाही, असा दावा केला आहे. तीन पक्ष एकत्र आल्यास फुटलेल्या आमदाराविरोधात अभ्या केलेल्या उमेदवाराला तिनही पक्ष पाठींबा देतील आणि तोच निवडून योईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.