मुंबई - पवई तलाव परिसरात हजारो उत्तर भारतीय बांधवांनी 'जीवित पुत्रिका' पूजन केले. या पुजेसाठी कुटुंबातील महिला 48 तास उपवास ठेवतात. या पुजेची सांगता सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळेस होणार आहे.
सायंकाळच्या वेळेस पवई तलावाच्या किनाऱ्यावर महिलांनी उभे राहून मावळत्या सूर्याला अर्ध्य दिले. विविध फळांचा नैवेद्य दाखवून सूर्याची प्रार्थना करण्यात आली. पवई विक्रोळी, घाटकोपर, कांजुर मार्ग, हिरानंदानी, साकीनाका, साकी विहार, मोरार्जी नगर, सर्वोदय नगर, मिलिंद नगर, समता नगर या भागातून आपल्या कुटुंबियांसह अनेक नागरिक आले होते.
हेही वाचा - 2014 विधानसभा निवडणूक: "काठावर पास" आमदार
दरवर्षी उत्तर भारतीय महिला आणि नवीन दाम्पत्य अपत्य प्राप्तीसाठी देवीचे व्रत ठेवून विधिवत पूजा करतात. कुटुंबातील ज्येष्ठ महिला आपल्या मुलांनी व्यवसायात प्रगती करावी यासाठी व्रत ठेवतात. या सणाचे उत्तर भारतीय बांधवांना मोठे आकर्षण आहे.