ETV Bharat / state

मुंबईत संक्रमण शिबिराचे गाळे वाढणार; 38 शिबिराचा होणार पुनर्विकास

पुनर्विकासाद्वारे अधिक गाळे उपलब्ध व्हावे, यासाठी नव्या धोरणाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुनर्विकास कसा करायचा, त्यातून कसे अधिक गाळे उपलब्ध होतील या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आधी मंडळाकडून प्रकल्प सल्लागार नेमण्यात येणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : Oct 29, 2020, 7:08 PM IST

Mhada
संक्रमण शिबिर

मुंबई - दक्षिण मुंबईत 14 हजारांहून अधिक जुन्या-मोडकळीस आलेल्या, धोकादायक उपकरप्राप्त इमारती आहेत. अशावेळी या धोकादायक इमारतीपैकी अतिधोकादायक इमारतीतील शेकडो रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्याची वेळ आल्यास पुरेसे गाळे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने आता गाळे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील 38 जुन्या संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करत 10 हजार नवीन गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर या पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त गाळ्यापैकी 30 टक्के आणखी गाळे उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

अतिधोकादायक आणि कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात तात्पुरते हलवले जाते. आतापर्यंत अशाप्रकारे हजारो कुटुंबांना म्हाडाने संक्रमण शिबिरात हलवले आहे. तर मुंबईत 58 संक्रमण शिबिरे आहेत. यातील 20 शिबिराचा पुनर्विकास करण्यात आला आहे. तर 20 शिबिरात मूळ 12,147 गाळे होते. त्यानुसार पुनर्विकासात यापेक्षा अधिक गाळे मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात दुरुस्ती मंडळाला 7,737 गाळेच उपलब्ध झाले. 4 ते 4000 गाळे कमी मिळाले. अशात सद्या मंडळाकडे गाळे कमी उपलब्ध असून एखादी मोठी दुर्घटना घडली वा इतर काही कारणांमुळे मोठ्या संख्येने रहिवाशांना स्थलांतरित करण्याची गरज पडली तर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत तसेच रहिवाशांना अधिकाधिक टॉवरमध्ये चकाचक गाळे मिळावेत यासाठी मंडळाने आता 30 संक्रमण शिबिराचा पुनर्विकास नव्या धोरणासह करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मंडळाला अधिक गाळे उपलब्ध होतील.

पुनर्विकासाद्वारे अधिक गाळे उपलब्ध व्हावे, यासाठी नव्या धोरणाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुनर्विकास कसा करायचा, त्यातून कसे अधिक गाळे उपलब्ध होतील या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आधी मंडळाकडून प्रकल्प सल्लागार (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) नेमण्यात येणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले आहे. तर पुनर्विकासात जे अतिरिक्त गाळे उपलब्ध होतील त्यातील 30 टक्के गाळे ही मंडळाला देण्याची महत्वपुर्ण तरतूद आता करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक गाळे मंडळाला भविष्यात उपलब्ध होणार आहेत.

पुनर्विकासात जे गाळे उपलब्ध होतील ते गाळे वितरित करण्यासाठीच्या धोरणातही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अतिधोकादायक आणि कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांना प्रथम प्रधान देण्यात येणार आहे. त्याचवेळी आजच्या घडीला खासगी बिल्डरांकडे म्हाडाचे 4000 गाळे आहेत. 2001 पासून 2015 पर्यंत हे गाळे त्यांना वितरित करण्यात आले आहेत. पण हे गाळे वर्षानुवर्षे बिल्डर परत करत नसल्याचे चित्र आहे. तेव्हा हे गाळेही ताब्यात यावेत यासाठी आता गाळे ताब्यात घेऊन काम न करणाऱ्या बिल्डरांना ही आता दणका देण्यात येणार आहे. त्यानुसार काम न करणाऱ्या बिल्डरांची एनओसी रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर हे गाळे ताब्यात घेण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.