ETV Bharat / state

Johnson and Johnson: जॉन्सन एन्ड जॉन्सनला दिलासा नाही, बंदी 30 नोव्हेंबर पर्यंत कायम - जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला उच्च न्यायालयातून

मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) एफडीएकडून (FDA) जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचे नमुने नव्याने गोळा करून मुंबईतील बीकेसी येथील दोन सरकारी आणि एक खासगी प्रयोगशाळेत सादर करण्याचे तसेच पावडरच्या नमुन्यांची तीन दिवसांत चाचणी करून आठवड्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

जॉन्सन एन्ड जॉन्सन
जॉन्सन एन्ड जॉन्सन
author img

By

Published : Nov 16, 2022, 3:07 PM IST

मुंबई - जॉन्सन कंपनीने (Johnson and Johnson) बेबी पावडरचे उत्पादन बंद करण्याच्या विरुद्ध उच्च न्यायालायचा दरवाजा ठोठावला होता. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयानं कंपनीला बेबी पावडरचे उत्पादन स्वतःच्या जबाबदारीवर करण्यास परवानगी दिली आहे. मात्र उत्पादनाच्या विक्री आणि वितरणावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून घातलेली बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. (ban imposed by FDA). त्यामुळे आजही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला उच्च न्यायालयातून कुठलाही दिलासा मिळाला नाही. (no relief for Johnson and Johnson).

पावडरमुळे कर्करोगाचा धोका? - मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएकडून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचे नमुने नव्याने गोळा करून मुंबईतील बीकेसी येथील दोन सरकारी आणि एक खासगी प्रयोगशाळेत सादर करण्याचे तसेच पावडरच्या नमुन्यांची तीन दिवसांत चाचणी करून आठवड्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. अनेक महिला आणि लहान मुलं जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरचा वापर करतात. परंतु या पावडरमुळे कर्करोगाचा धोका आहे असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात अनेक न्यायालयात अनेक खटले दाखल झाले आहेत. याशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. या आरोपांमुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावे लागत आहे.

विक्रीवर परिणाम - जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवरील आरोपांमुळे या उत्पादनाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी घट झाली आहे. जागतिक स्तरावर व्यवसायाचा विचार करता कंपनीनं 2023 पर्यंत बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पोर्टफोलिओ मुल्यांकनानंतर हा निर्णय घेतला आहे. यामध्ये भौगोलिक प्रदेश उत्पादनांची मागणी आणि ग्राहकांचा कल या घटकांचा अभ्यास केला जातो. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर 2020 मध्ये बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचा आरोप करण्यात आला होता. कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले. यानंतर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून बेबी पावडरचे उत्पादन हटवले आहे. दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं आरोपाचं वारंवार आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर्व घटक सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.