ETV Bharat / state

मुंबईत आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा - ventilator beds shortesge in mumbai

मुंबईत आयुसीयूचे 45 तर व्हेंटिलेटरचे 12 बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे.

No ICU, ventilator beds for Covid patients in over mumbai hospitals
मुंबईत आयसीयू, व्हेंटिलेटरचा तुटवडा
author img

By

Published : Apr 14, 2021, 6:05 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुंबईत आयसीयूचे 45 तर व्हेंटिलेटरचे फक्त 12 बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यासाठी येत्या 15 दिवसात 4 जम्बो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5 हजार 300 बेड आणि 800 आयसीयू असणार आहेत.

आयसीयू, व्हेंटिलेटरचा तुटवडा -
13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये एकूण 25 हजार 676 खाटा आहेत. त्यापैकी 20 हजार 688 खाटांवर रुग्ण असून 4 हजार 988 खाटा रिक्त आहेत. पालिका सरकारी रुग्णालयात 19 हजार 534 खाटा आहेत. त्यापैकी 15 हजार 744 खाटांवर रुग्ण असून 3 हजार 790 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 10 हजार 51 खाटा आहेत. त्यापैकी 8 हजार 654 खाटांवर रुग्ण असून 1 हजार 397 खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 598 खाटा आहेत. त्यापैकी 2 हजार 553 खाटांवर रुग्ण असून 45 आयसीयू बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या 1 हजार 306 खाटा आहेत. त्यापैकी 1 हजार 294 बेडवर रुग्ण असून 12 बेड रिक्त आहेत.

रेमडेसिवीरचा मुबलक साठा -
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे 22 हजार रेमडेसिवीर इजेक्शनचा साठा आहे. 25 हजार इंजेक्शन लवकरच येणार आहे. तर 2 लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे.

ऑक्सिजनचा योग्य पुरवठा -
मुंबईत रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यासाठी पालिकेने ऑक्सिजन सिलेंडर ऐवजी मोठे टॅंक बसवले आहेत. मुंबई महापालिकेला एकच पुरवठादार ऑक्सिजनचा पुरवठा करत होता. आता तीन पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पालिकेकडे कोणत्याही प्रकारे ऑक्सिजनची कमतरता राहणार नाही.

90 हजार 267 सक्रिय रुग्ण -
मुंबईत 13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 5 लाख 27 हजार 119 कोरोना बाधित आहेत. 12 हजार 060 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 4 लाख 23 हजार 676 रुग्ण बरे झाले आहेत. 90 हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 73 हजार 371 रुग्ण लक्षणे नसलेले तर 15 हजार 582 लक्षणे असलेले रुग्ण आहेत. 1 हजार 314 रुग्णांची अवस्था गंभीर आहे. मुंबईत 88 चाळी झोपडपट्ट्या, 970 इमारती तर 10 हजार 983 मजले सील करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी 46 लाख 99 हजार 507 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बांद्रा, गोरेगाव, बोरोवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर घाटकोपर आदी भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या विभागात विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत.

17 लाख 53 हजार लाभार्थ्यांना लस-
मुंबईत आतापर्यंत एकूण 17 लाख 53 हजार 452 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 15 लाख 50 हजार 463 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 2 हजार 989 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 60 हजार 206 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 84 हजार 869 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 88 हजार 888 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 लाख 19 हजार 489 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

15 दिवसात बेडची संख्या वाढवणार -
कंजूरमार्ग येथे एमएमआरडीए 2 हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. त्यात आयसीयूचे 200 बेड असतील. मालाडच्या रहेजा ग्राऊंडवर सिडकोकडून कोविड सेंटर उभारले जाणार आहे. त्यात 2 हजार बेड असून 200 आयसीयू बेड असतील. चुनाभट्टी येथे सोमय्या ग्राऊंडवर म्हाडा 1 हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार असून त्यात 200 आयसीयू असतील. महालक्ष्मी येथे 3 हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार असून त्यात 200 आयसीयू बेड असतील. या चार ठिकाणी येत्या 15 दिवसात जंबो कोविड सेंटर उभारली जाणार असून त्यात 5300 बेड तर 800 आयसीयू उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे हॉटेल, सरकारी कार्यालये, मंगल कार्यालये, शाळा आदी ठिकाणी कोविड सेंटर उभारली जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.