ETV Bharat / state

तूर्तास दिवाळीनंतर कॉलेज सुरू करण्याचा कोणताही निर्णय नाही - उदय सामंत - uday samant on college openings

राज्यात कोरोनाच्या काळात झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत 15 टक्के इतके वाढलेले आहे. आज आम्ही जी गुणपत्रिका दिली, त्यावर कोविडचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. आम्ही हे करून दाखवले आहे. सध्या ही तात्पुरती गुणपत्रिका आहे, मुख्य गुणपत्रिका लवकरच दिली जाईल. पदवीच्या प्रमाणपत्रावरही कोणताच बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

minister uday samant
उदय सामंत
author img

By

Published : Nov 6, 2020, 4:43 PM IST

मुंबई - दिल्लीत जी कोरोनाची दुसरी लाट आली, त्या पार्श्वभूमीवर राज्यात काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू करायचे का? यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, यासाठी दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यासंदर्भात राज्यातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर सामंत यांनी परीक्षा निकालांच्या अंदाजे टक्केवारीची माहिती मंत्रालयात‍ घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना.

यावेळी ते म्हणाले, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आज जे वातावरण सुरू आहे, त्यासाठी आम्ही कॉलेज सुरू करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. अनेक वसतीगृहात, कॉलेजमध्ये क्वारंटाइन सेंटर आहेत, यामुळे आम्हाला विचार करावा लागेल. विद्यार्थी, प्राध्यापकांना त्रास होणार नाही, असा आम्ही निर्णय घेऊ. मात्र, आमच्याकडे काही कुलगुरुंनी परीक्षेप्रमाणेच ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाच्या काळात झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत 15 टक्के इतके वाढलेले आहे. आज आम्ही जी गुणपत्रिका दिली, त्यावर कोविडचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. आम्ही हे करून दाखवले आहे. सध्या ही तात्पुरती गुणपत्रिका आहे, मुख्य गुणपत्रिका लवकरच दिली जाईल. पदवीच्या प्रमाणपत्रावरही कोणताच बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविडच्या काळात अनेकांनी विद्यापीठांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. याला विद्यापीठांनी चांगले उत्तर दिले आहे. मात्र, सरकारने अतिशय चांगली कामगिरी केली. यामुळे राज्यात एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेला नाही. मात्र, याच परीक्षांच्या काळात मुंबई, पुण्यात जो प्रकार घडला त्याची चौकशी करण्यासाठी समिती करत आहे. ज्या कंपन्यांनी अडचणी उभ्या केल्या, त्यांना आम्ही सोडणार नाहीत. अनेक ठिकाणची सायबरकडे तक्रार केली आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसांत नेमके काय झाले, त्याचे चित्र समोर येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा - पुढील वर्षापासून तालुकास्तरावर 'सीईटी'; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

ऑनलाइनसाठी तंत्रज्ञान विकसित करू -

आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे परीक्षा सुरळीत घेतल्या. आम्हाला येत्या काळात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांची गरज लागणार नाही, असे तंत्रज्ञान आम्ही लवकरच विकसित करणार आहोत, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

यूजीसीने आपला निर्णय बदलू नये -

कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन कॉलेज सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे यूजीसीने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्याबाबत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. मात्र, आता यूजीसीने आपले पत्र डिसेंबर महिन्यात बदलू नये, आम्ही त्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करू, असेही सामंत म्हणाले.

मार्चे कशासाठी?

आम्ही परीक्षा घ्याव्यात म्हणून ते काढले जात होते. आता आम्ही परीक्षाही घेतल्या आणि निकालही लावत आहोत. अशावेळी पुणे, नागपूर, गोंडवाना येथे का मोर्चे काढले जात आहेत? प्रत्येक विद्यापीठांमध्ये मोर्चे आंदोलन सुरू आहेत. त्यांना सांगायचे आहे, आम्ही परीक्षेप्रमाणेच प्रवेश प्रक्रियाही योग्य पद्धतीने सुरू करू, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.