ETV Bharat / state

मुंबईत रविवारी कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही.. - Corona Positive Patient in Mumbai

१८ जानेवारीपासून आतापर्यंत विमानतळावर २,३०,५८९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी आज कस्तुरबा रुग्णालयात ४५८ प्रवाशांना दाखल केले. ३८० लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

No Corona Positive Patient in Mumbai Today
मुंबईत आज कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही
author img

By

Published : Mar 15, 2020, 11:26 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या आणि हजारो नागरिकांचे बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसचा आज शहरात एकही रुग्ण सापडलेला नाही. मुंबई आणि मुंबई परिसरात शनिवार पर्यंत कोरोना व्हायरसचे ९ रुग्ण सापडले होते. मात्र, आज कोणताही रुग्ण सापडला नसल्याने मुंबई आणि परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या ९ असून त्यात कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती पालिकेच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले.

मुंबईत आज कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही

मुंबईत सध्या कोरोनाचे ५ रुग्ण असून ठाणे, कल्याण, वाशी, कामोठे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत. कोरोनाच्या प्रसाराबाबत मुंबई स्टेज दोनवर असल्याने नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबईमध्ये शुक्रवारी १३ मार्च पर्यंत ५ कोरोनाचे रुग्ण होते. त्यात पुण्याच्या रुग्णाच्या सानिध्यात आलेले २, हिंदुजा रुग्णालयातील १, तर ठाण्यातील एक रुग्ण होता. त्याच दिवशी रात्री हिंदुजामधील रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. शनिवारी मुंबईत आणखी ४ रुग्ण सापडले. त्यात हिंदुजामधील रुग्णाचा आणखी एका नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर ठाणे, कल्याण, वाशी, कामोठे येथील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. या सर्वांवर मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

कस्तुरबा रुग्णालयात संशयित ९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे शाह यांनी सांगितले. कस्तुरबामधील ओपीडी आणि लॅबमध्ये आतापर्यंत १५०० लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या ९ रुग्णांची माहिती -

मुंबई आणि मुंबई परिसरात सापडलेल्या ९ रुग्णांपैकी २ महिला तर ७ पुरुष आहेत. ९ रुग्णांपैकी ६ रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त आहेत. या सहाही रुग्णांना डायबेटीस आणि हायपरटेन्शन सारखे आजार आहेत. तर ३ रुग्णांचे वय ३० ते ४० च्या दरम्यान आहे. ९ पैकी ८ रुग्णांनी देशाबाहेर प्रवास केल्याचे समोर आले आहे. तर एका रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णाचा नातेवाईक आहे.

मुंबई कोरोनाच्या प्रसारात स्टेज दोन वर -

कोरोना व्हायरसच्या प्रसारात पहिला स्टेजमध्ये देशाबाहेरून आलेल्या लोकांना याची लागण होते. तर दुसऱ्या स्टेजमध्ये देशाबाहेरून आलेल्या लोकांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना कोरोना होतो. मुंबईत एका रुग्णाच्या नातेवाईकाला कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे मुंबई आता कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे. कोरोनाच प्रसार थांबवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन दक्षा शाह यांनी केले.

कोरोनाबात आजच्या चाचण्या आणि कारवाई -

१८ जानेवारीपासून आतापर्यंत विमानतळावर २,३०,५८९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी आज कस्तुरबा रुग्णालयात ४५८ प्रवाशांना दाखल केले. ३८० लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आज दिवसभरात ४३ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील कालपर्यंत कोरोनाचे ९ रुग्ण आढळले होते. आज नवा रुग्ण सापडला नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही.

कोरोनाबाबत जनजागृती -

मुंबई आणि मुंबई परिसरात कोरोनाचे ९ रुग्ण सापडल्यावर पालिकेने शनिवार पासून जनजागृती अभियान सुरु आहे. आज रविवारीही हे जनजागृती अभियान सुरु होते. त्यात १०६७ लोंकाच्या टीमने १० हजार २७ सोसायट्यांना भेटी देऊन कोरोनाचे पोस्टर लावून जनजागृती तसेच देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा केली.

चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर -

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाबत ओपीडी सेवा सुरू आहे. त्यात दिवसाला ३५० लोक तपासणीसाठी येत आहेत. कस्तुरबा रुग्णालयात सध्या दिवसाला १०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. यामुळे चाचण्या करण्यासाठी नवीन चाचणी मशीन घेतल्या जात आहेत. त्या बुधवार पासून कार्यरत होतील. त्यामुळे कस्तुरबामध्ये आता होणाऱ्या १०० चाचण्यांची संख्या वाढून ३०० पर्यंत होणार आहेत. तर पालिकेच्या केईएम रुग्णालयातही कोरोनाच्या चाचणीसाठी लॅब सुरु केली जाणार असून त्याठिकाणीही दिवसाला २५० चाचण्या केल्या जातील. यामुळे कस्तुरबा रुग्णालयावर येणार ताण कमी होणार आहे.

सोशल मीडियामध्ये अफवा पसरू नये -

व्हाट्सअप, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांच्या फोटोसह हे कोरोनाचे रुग्ण असल्याचे संदेश पसरवले जात आहेत. तसेच इतर कोरोना व्हायरसबाबत संदेश पसरवून लोकांमध्ये भीती पसरवली जात आहे. यामुळे सोशल मीडियावरून अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.