ETV Bharat / state

Ramdas Athavale : महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य नको, २०२४ मध्ये युतीचाच मुख्यमंत्री -रामदास आठवले - रामदास आठवले

महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य होऊ नये, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केले आहे. तसेचं, 2024 मध्ये युतीचाच मुख्यमंत्री होईल असे ते म्हणाले.

Ramdas Athavale
Ramdas Athavale
author img

By

Published : Dec 1, 2022, 3:39 PM IST

मुंबई : महापुरुष हे सर्वांचे प्रेरणास्थान असतात. यामुळे महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य होऊ नये असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केले आहे. विरोधकांनीही असे विषय किती ताणावे याचा विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. २०२४ मध्ये भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आरपीआय युतीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा आठवले यांनी केला आहे.

महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य नको, २०२४ मध्ये युतीचाच मुख्यमंत्री -रामदास आठवले

महापुरुषांचा अवमान नको - आठवले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज इंदू मिल येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. या पाहणी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, महापुरुषांचा अवमान होता कामा नये. डॉ. आंबेडकर असो की छत्रपती शिवाजी महाराज असोत ते सर्वांचे प्रेरणा स्थान आहेत. यामुळे महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य होऊ नये असे माझे मत आहे. विरोधकांनीही हे कितपत ताणायचे याचा विचार करण्याची गरज आहे. राज्यपालांना राष्ट्रपतींनी नियुक्त केले असते त्यामुळे त्यांच्याबाबत तेच निर्णय घेतील.

आमचाच मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य केले आहे. यावर बोलताना, त्यांच्याकडे महिला मोठ्या संख्येने आहेत. मात्र, आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आमचाच मुख्यमंत्री होईल. येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा आणि आरपीआय यांचा मुख्यमंत्री असेल असे आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. मी १९९२ ला काँग्रेस सोबत गेल्याने पालिकेतील शिवसेनेची सत्ता गेली होती. आता भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत असल्याने पालिकेत आमची सत्ता येईल असे आठवले म्हणाले.

मंत्रिपद मिळेल -आठवले येत्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आरपीआयला मंत्रिपद मिळावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यांनीही मंत्रिपद देण्याचे मान्य केले आहे. येत्या महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपा आम्हाला मंत्रिपद देईल अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे.

२०२४ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण : इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. हे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन केले जाईल. या स्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आंबेडकरी जनता डॉ. आंबेडकर यांचे फॅमिली यांच्यासोबत बैठक घेऊन पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आठवले यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.