मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार यांनी जेजे रुग्णालयात देसाई यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी अजित पवार यांनी देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती दिली.
नितीन देसाईंच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या रायगड पोलिसांना देसाई यांच्या कार्यालयात सापडलेल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप सापडल्या आहेत. यापैकी एका क्लिपमध्ये त्यांनी 'पाऊले चालती पंढरीची वाट' असे म्हटले आहे. देसाई यांच्याकडून जास्त व्याज आकारण्यात आले होते की नाही याची चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
आत्महत्येपूर्वी मंदिरात केली प्रार्थना- कलाकारांना आणि नवोदित प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी एन डी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, असे देसाई यांनी क्लिपमध्ये आवाहन केले आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार देसाई मध्यरात्री दिल्लीहून मुंबई विमानतळावर उतरले. बुधवारी पहाटे 2 च्या सुमारास कर्जत येथील 60 किमी दूर असलेल्या त्यांच्या स्टुडिओत पोहोचले. त्यांनी स्टुडिओच्या आवारातील मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर एका मदतनिसाला स्टुडिओभोवती फेरफटका मारण्यासाठी बरोबर येण्यास सांगितले. त्यांनी अटेंडंटला मेगा फ्लोअरची चावी आणण्यास सांगितले. त्यावेळी मेगा फ्लोअरवर मध्यवर्ती स्टेजच्या मध्यभागी दोरी अडकवली.
दोरीवरून धनुष्यबाणाचे डिझाईन- देसाई यांनी महिनाभरापूर्वीच जीवन संपवण्याचा प्लॅन आखला होता, असा पोलिसांचा संशय आहे. तशी दोरी का लटकवली आहे, असे विचारले तेव्हा त्यांनी ते वास्तुशास्त्रानुसार असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. देसाई यांनी पहाटे ४ ते ६ या वेळेत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्टेजच्या फरशीवर दोरीवरून धनुष्यबाणाचे डिझाईन बनवले होते.
हेही वाचा-
- Mungantiwar Reaction : नितीन देसाई यांचे जाणे मनाला चटका लावून जाणारी घटना - सुधीर मुनगंटीवार
- Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली? भाजप आमदाराने केला मोठा दावा
- Nitin Desai News :लालबागच्या राजाला मृत्यूपूर्वी देसाईंनी केला अखेरचा नमस्कार... ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांकडे काय केली मागणी?