मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी आत्महत्या केली आहे. आथिर्क तंगी असल्याकारणाने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे कर्जत, खालापूरचे आमदार तसेच नितीन देसाई यांचे मित्र आमदार महेश बालदी यांनी म्हटले आहे. नितीन देसाई यांचा कर्जत येथे एनडी नावाने प्रचंड मोठा स्टुडिओ आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून या स्टुडिओमध्ये शूटिंग बंद झाल्या होत्या. शूटिंग बंद होण्यामागे काही कलाकारांबरोबर त्यांचा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. शूटिंग होत नसल्याकारणाने आर्थिक कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते.
नितीन देसाई यांच्याविषयी थोडक्यात : नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म 6 ऑगस्ट 1965 रोजी महाराष्ट्रातील दापोली येथील भागवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील मुलुंड येथील वामनराव मुरंजन हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेतून पूर्ण केले होते. 2005 मध्ये, त्यांनी कर्जत येथे 50 एकर (21 हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरू केला. त्यांनी जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल तसेच बिग बॉससारखे रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत.
कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर अशी चंद्रकांत देसाई यांची ओळख होती. चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता म्हणून त्यांनी काम केले. भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माता म्हणून त्यांनी केले. दिल्ली येथे 'जागतिक सांस्कृतिक महोत्सव 2016' आणि 'हम दिल दे चुके सनम' यांसारख्या चित्रपटांमध्ये कामासाठी प्रसिद्ध आहेत. सनम (1999), लगान (2001), देवदास (2002), जोधा अकबर (2008) आणि प्रेम रतन धन पायो (2015) हे त्यांचे कला दिग्दर्शन केलेले व नावाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 2002 मध्ये, चंद्रकांत प्रॉडक्शनच्या 'देश देवी' या कच्छच्या देवी मातेवरील भक्ती चित्रपटातून ते चित्रपट निर्माता झाले. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा :