ETV Bharat / state

Nitesh Rane Relief : नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा - High Court

भाजपाचे आमदार नितेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांच्याविरोधात पनवेल पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा (Case Registered Against Nitesh Rane) दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा दिला (Relief of Nitesh Rane by Bombay High Court) असून प्रतिवादी पक्षाला नोटीस पाठवण्यात आली आहे.

Nitesh Rane Get Relif
Nitesh Rane Get Relif
author img

By

Published : Aug 18, 2023, 3:52 PM IST

मुंबई : धार्मिक भावना भडकावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दिलासा दिला आहे. न्यायालयाने प्रतिवादी पक्षाला नोटीस पाठवली असून या संदर्भात ८ आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

नितेश राणेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : भाजपा नेते नितेश राणे यांनी दोन धर्मांमध्ये भावना भडकवणारे वक्तव्य केल्यानंतर अरविंद कटरनवरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी दिले होते. त्या आदेशाच्या आधारे पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्ह्यांची तक्रार दाखल करणारे वकील अमित कातरनवरे म्हणाले की, 'भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 153B, 295 आणि ॲट्रॉसिटी कायदा 1989 च्या कलम 3 अन्वये, राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे दोन धर्मात तेढ : भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना 'दलित' समाजाबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे याप्रकरणी वकील अरविंद कातरनवरे यांनी फिर्याद दिली आहे. मात्र, नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप अरविंद कटारनवरे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांना कोर्टात जावे लागले.

हेही वाचा -

  1. Mumbai Covid Scam : काही दिवसातच संजय राऊत कारागृहात - नितेश राणे
  2. Nitesh Rane On INDA : भारताचे विभाजन करण्‍याचा विरोधकांचा कट - नितेश राणे
  3. Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना....; नितेश राणेंची जोरदार टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.