मुंबई : Nitesh Rane On Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार गंभीर आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व स्तरावर बैठका सुरू आहेत. मी जरांगे पाटलांना आवर्जून सांगेन की, ते एका बाजूला आरक्षणाची मागणी करत असताना सरकार तुमच्याबरोबर, समाजाबरोबर आहे. पण सरकारने जी चांगली कामं केली आहेत ती तुम्ही जाहीर भाषणामध्ये सांगावी. सरकारने मराठा आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेतले. सरकार नेहमी मराठा समजाच्या पाठीशी आहे. तुम्ही सरकारने मराठा समाजासाठी केलेली कामे जनतेला सांगा, तर जनता तुमच्या पाठीशी येईल. जनतेला सुद्धा माहीत पडेल की सरकारने समाजासाठी काय केले आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या मुलांनी आयुष्य संपवू नये. जेव्हा आरक्षण अगदी जवळ आलेले आहे. नोकरी व्यवसायात चांगली संधी आहे. फक्त योग्य क्षणाची वाट पहा. आता विजयोत्सव फार लांब राहिलेला नाही, असेही राणे म्हणाले.
कोण डूप्लिकेट व कोण चायनीज मॉडेल? : दसरा मेळाव्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्क शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा खरं सोनं लुटणारा मेळावा आहे, असे सांगत बाकी सगळे मेळावे हे चायनीज मॉडेल असल्याचे सांगितले आहे. नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या या विधानाचा समाचार घेताना म्हटले आहे की, यंदा उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात केवळ आपला पुत्र आदित्य ठाकरे कसा निर्दोष आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होणारा दसरा मेळावा हा खरा विचारांचे सोनं लुटणारा मेळावा आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता हा खरा देशभक्त व कट्टर हिंदुत्वादी विचारांचा आहे. म्हणून कोण डूप्लिकेट व कोण चायनीज मॉडेल हे जनतेला पूर्ण माहीत असल्याचेही राणे म्हणाले.
नवीन सोडा, जुन्या मित्रांना बरोबर ठेवा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून सुद्धा नितेश राणे यांनी टोमणा मारला आहे. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना कॉफी पाजण्यापेक्षा आपल्या जुन्या मित्रांची वडापावची सोय तरी करायची. कारण नितेश कुमार, अखिलेश यादव यांच्यासारखे नेते हे 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडायच्या मार्गावर आहेत. अशात नवीन मित्रांना 'इंडिया' आघाडीत घेण्यापेक्षा जुन्या मित्रांना सोबत ठेवणे त्यांना जास्त गरजेचे आहे. त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ज्या काही जागांची मागणी केली आहे त्याला काँग्रेसने स्पष्ट नकार दिला असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
- Maratha Youth Suicide : मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ
- Maratha Reservation Protest : एकच मिशन, मराठा आरक्षण.. आरक्षण जालन्यातील 245 गावांत राजकीय पुढाऱ्यांना 'गावबंदी'
- India Canada Relations Explained : भारतानं कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत का पाठविलं? जाणून घ्या सविस्तर