ETV Bharat / state

Nitesh Rane On Maratha Lathicharge : मराठा समाजाला कोणीतरी बदनाम करू इच्छित आहे - नितेश राणे

Nitesh Rane On Maratha Lathicharge : मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंबडमध्ये उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. (Jalna Lathicharge) याला प्रत्युत्तर म्हणून मराठा समाजातील तरुणांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याचं खंडन केलं आहे. मोर्चावेळी पोलिसांवर दगडफेक मराठा समाजातील तरुणांनी केली असेल, (Nitesh Rane on Maratha Community) असं मला वाटत नाही. मराठा समाजाला कोण बदनाम करू इच्छित आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. (Defamation of Maratha Community)

Nitesh Rane On Maratha Lathicharge
नितेश राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 6:29 PM IST

मुंबई Nitesh Rane On Maratha Lathicharge : मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंबडमध्ये उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ विरोधकांकडून जोरात टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, (Jalna Lathicharge) मराठा समाजाचे आजवर ५८ मोर्चे शांतपणे निघाले आहेत. (Nitesh Rane on Maratha Community) मग जेव्हा जालन्यातील या मोर्चावेळी पोलिसांवर दगडफेक मराठा समाजातील तरुणांनी केली असेल, असं मला वाटत नाही. मराठा समाजाला कोण बदनाम करू इच्छित आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ते बोलत होते. (Defamation of Maratha Community)

मराठा आरक्षण राणे समितीने दिले : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, जालनामध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. हा लाठीचार्ज मस्ती करून अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर आमचं सरकार कारवाई करणार. मराठा आरक्षण हे राणे समितीनं दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते टिकवलं. ठाकरे सरकारने तेव्हा कोर्टात चांगला वकील न देता मराठा आरक्षणाची वाट लावली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री असताना मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून दिले. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये, असंही नितेश राणे म्हणाले.

याची चौकशी झाली पाहिजे : नितेश राणे पुढे म्हणाले की, हिंदुंचे निघणारे जनआक्रोश मोर्चे ही विरोधकांची पोटदुखी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बस जाळपोळ घटनेत अंबादास दानवे यांच्या निकटवर्तियांचा हात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत जे दंगल होणार असे म्हणत होते ती हीच काय? याची चौकशी झाली पाहिजे. मराठा समाजाला माझे आवाहन आहे की फडणवीस सरकारनेच आपल्याला आरक्षण मिळवून दिले होते. राज्यातील युती सरकार हे मराठा समजाविरोधात नाही. आपण सर्वांनी शांततेनं घ्यावं, असं नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा:

  1. Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात
  2. Nana Patole On Baton Charge Jalna : राहुल गांधीचं भाषण टीव्हीवर दिसू नये म्हणून गृहमंत्र्यांच्या आदेशानेच लाठीचार्ज - नाना पटोले यांचा आरोप
  3. Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सरकार यांनीच मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला, बावनकुळेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.