ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी ( Attack on Santosh Parab ) भाजपचे आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दणका दिला आहे. आता नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Nitesh Rane
नितेश राणे
author img

By

Published : Jan 22, 2022, 3:06 PM IST

Updated : Jan 22, 2022, 5:14 PM IST

मुंबई - संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ( Bjp Mla Nitesh Rane in Supreme Court ) याआधी जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी ( Attack on Santosh Parab ) भाजपचे आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ( High Court Denied Pre arrest Bail of Nitesh Rane ) असे असले तरी त्यांना पोलीस तातडीने अटक करू शकत नाहीत. त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 27 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ही मुभा देण्यात आली होती. आता त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा - Singer Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा; मात्र...

काय आहे प्रकरण?

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुनी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन सातपुते या आरोपीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत फोनवरून कॉन्टॅक्ट होता. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे यांना सह आरोपी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडे सरकारी वकिलांनी केली होती. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारीत आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे दिली होती. याप्रकरणी नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि आमदार नितेश राणे यांचे सचिव राकेश परब यांचे देखील नाव समोर आले होते. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

Last Updated : Jan 22, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.