ETV Bharat / state

मुंबईत 910 नवे कोरोनाबाधित, 57 जणांचा मृत्यू; रुग्ण दुपटीचा कालावधी 80 दिवस - mumbai corona deaths

मुंबईत आज (गुरुवार) कोरोनाचे 910 नवे रुग्ण आढळून आले असून 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी बहुतेकांना दीर्घकालीन आजार होते. आता मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 20 हजारांच्या पुढे गेला आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर गेला आहे.

मुंबईत 910 नवे कोरोनाबाधित
मुंबईत 910 नवे कोरोनाबाधित
author img

By

Published : Aug 6, 2020, 10:10 PM IST

मुंबई - मुंबईत आज (गुरुवार) कोरोनाचे 910 नवे रुग्ण आढळून आले असून 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 20 हजार 165 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 645 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 988 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 92 हजार 661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. सध्या मुंबईत 20 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर पोहचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 41 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 20 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 988 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 92 हजार 661 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 20 हजार 165 रुग्ण असून 92 हजार 661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 645 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवस तर सरासरी दर 0.87 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 619 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 661 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 74 हजार 919 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.