मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. 'संजय राऊत यांच्यासारखी लोकं पेंग्विनचा पण राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये' असं वक्तव्य राणेंनी ट्विटरवर केले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवरुन राणेंनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्वपूर्ण विधान केले होते. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. पण राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.
![mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3550052_rauuu.jpg)
'संजय राऊत यांच्यासारखी लोकं ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये', असे ट्विट निलेश राणेंनी केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता शिवसेना याला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे गरजेचे आहे.