मुंबई - 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्यासंदर्भात गुरूवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला संमती देण्यात आली आहे. याबाबतची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम मांडली होती. या निर्णयानंतर मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरू राहणार असून या निर्णयाची कोणावरही सक्ती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या कचरा पुर्नचक्रीकरणाच्या विविध पद्धती, उपलब्ध सामग्री व त्यांचा वापर” या विषयावर आधारित प्रदर्शन ‘फॅशन शो’ तसेच स्वच्छता स्पर्धेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी आदित्य ठाकरे बोलत होते.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा मुक्काम लवकरच मंत्रालयासमोर...
मागील सरकारच्या काळातच आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्यासंदर्भात संकल्पना मांडली होती. शुक्रवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये प्रायोगीक तत्वावर मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात 26 जानेवारीपासून पायलट प्रोजेक्ट् म्हणून मुंबईतील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरू राहणार आहेत. मंत्रालय, कालाघोडा, बिकेसी अशा रहिवासी वस्ती नसेलेल्या भागात ही दुकाने चालू राहतील. यासाठी आम्ही कोणावरही दुकाने चालू राहवी म्हणून सक्ती करणार नसल्याचेही म्हटले आहे. या निर्णयामुळे ज्यांचा धंदा चांगला चालेल ते आपली दुकाने आणि हॉटेल सुरू ठेवतील, असेही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - 'मला जर बेळगावमध्ये येण्यापासून रोखायचे असेल तर कायद्याने रोखावे'
आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टिका केली आहे. या टिकेला उत्तर देताना अहमदाबादमध्ये दुकाने रात्रभर सुरू राहू शकतात, मग मुंबईने मागे का रहावे, असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला. मुंबईत रात्रभर पंचतारांकीत हॉटेल्स सुरू असतात. त्याठिकाणी गरिबांना आणि सामान्य मुंबईकरांना जाता येत नाही. दुकाने आणि हॉटेल 24 तास सुरू राहिल्याने सामान्य मुंबईकरांना त्याचा फायदा होईल असे म्हणत आदित्य यांनी शेलार यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.
हेही वाचा - एक 29 वर्षाचा तरुण टीम मेंबर म्हणून माझ्याकडे बघावं - आदित्य ठाकरे
चांगले रस्ते, कचरा मुक्त आणि आरोग्य मुक्त मुंबई ही संकल्पना आहे. मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी 10 हजार मॅट्रिक टन कचरा गोळा केला जायचा. आता 6500 मॅट्रिक टन कचरा गोळा केला जात आहे. पालिकेने कचरा वर्गीकरण आणि त्याची जागेवरच विल्हेवाट लावण्यास भर दिल्याने हे शक्य झाले आहे. आता हि संकल्पना संपूर्ण राज्यात राबवून कचरा मुक्त महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या बाजूचा 10 फुटाचा परिसर स्वच्छ ठेवला तर हे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कचरा मुक्त महाराष्ट्र ही संकल्पनेचीही येत्या 26 जनेवारीपासून अंमलबजावणी केली जाईल असेही आदित्य म्हणाले.
काय आहे नाईट लाईफ संकल्पना
आदित्य ठाकरे यांनी मुंबईमधील दुकाने 24 तास खुली राहवीत, अशी संकल्पना दोन वर्षांपूर्वी मांडली होती. मुंबई महापालिकेने तसा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. पालिकेलीत सत्ताधारी शिवसेना भाजपा सोबत राज्यात सत्तेत होती. मात्र, भाजपचा विरोध असल्याने या संकल्पनेला राज्य सरकारने मंजुरी दिली नव्हती. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होताच आदित्य ठाकरे यांनी आपल्या नाईट लाईफच्या संकल्पनेला पूर्णत्वाकडे नेले आहे.