ETV Bharat / state

NIA Court Reject Salim Qureshi Bail : देश-विदेशात दहशतवादी कारवाया; 'डी गँग'चा गुंड सलीम कुरेशीचा जामीन अर्ज एनआयए कोर्टानं फेटाळला

NIA Court Reject Salim Qureshi Bail : देश विदेशात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी एनआयएनं दाऊद टोळीचा गुंड सलीम कुरेशीला अटक केली आहे. या प्रकरणी जामीन मिळण्यासाठी सलीम कुरेशीनं विशेष एनआयए न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र विशेष एनआयए न्यायालयानं तो फेटाळून लावला आहे.

NIA Court Reject Salim Qureshi Bail
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 9:36 AM IST

मुंबई NIA Court Reject Salim Qureshi Bail : सलीम कुरेशी याचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयानं बुधवारी फेटाळून लावला आहे. दाऊद टोळीमध्ये तो सहभागी होता आणि दहशतवादी कृत्य केल्याचे अनेक तथ्य समोर येतात, असा राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा एनआयए ( NIA Raid ) न्यायालयानं मान्य केला. त्यामुळे सलीम कुरेशीचा जामीन न्यायाधीश बी डी शेळके यांनी बुधवारी फेटाळून लावला आहे.

दाऊद टोळीकडून दहशतवादी कारवाया केल्याचं उघड : सलीम कुरेशीनं दाऊदच्या टोळीमध्ये दहशतवादी कारवाया केल्याचं उघड झालं आहे. गुंड छोटा शकील याचा मित्र सलीम कुरेशी याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं त्यांच्याकडं सकृत दर्शनी पुरावे असल्याचा दावा न्यायालयात केला होता. त्या पुराव्यांमध्ये सलीम कुरेशी हा दहशतवादी कार्यामध्ये सामील असून भारतात आणि विदेशात दहशतवादी कृती केल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयानं बुधवारी नाकारला आहे.

दहशतवादी टोळी सक्रिय नसल्यानं द्या जामीन : सलीम कुरेशीचे वकील विकार राजगुरू यांनी एनआयए न्यायालयात सलीमची बाजू मांडली. 'सलीम कुरेशीवर ठेवण्यात आलेले आरोपाप्रकरणी त्यानं एका वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगावास भोगला आहे. 2004 च्यानंतर टोळी विरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल केलेलं नाही. शिवाय 2004 या काळानंतर दहशतवादी टोळी कुठंही सक्रिय दिसत नाही. त्यामुळेच सलीम कुरेशीला जामीन मिळायला हवा' असा युक्तीवाद सलीम कुरेशीचे वकील विकार राजगुरु यांनी केला आहे.

दाऊदची पाळंमुळं खोलवर रुजलेली : राष्ट्रीय तपास संस्थेनं सलीम कुरेशीच्या जामीनाला मोठा विरोध केला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी '3 फेब्रुवारी 2022 रोजी याबाबत युक्तिवाद केला होता. दाऊदची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत. सलीम कुरेशी त्या गटात सहभागी आहे. देशात आणि देशाबाहेर यांच्या दहशतवादी कारवाया सुरू असतात. त्यामुळे सलीम कुरेशीला जामीन देऊ नये', असा युक्तीवाद केला.

काय म्हणालं एनआयए न्यायालय : एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश बी डी शेळके यांनी 'अशा खटल्यामध्ये पुराव्याच्या खोलात जाण्याची तितकीशी गरज नाही. कारण याबाबत सर्वोच्च न्यायालयानं काही निर्देश दिलेलेचं आहेत. त्यामुळे आरोपीच्या संदर्भात किंवा फिर्यादीचा हा खटला चालवायचे की नाही, हे उपलब्ध तथ्यावर आधारित ठरेल. उपलब्ध तथ्य आणि रेकॉर्डवरील सामग्रीच्या आधारे एनआयए न्यायालयाकडून सलीम कुरेशीला जामीन देता येणार नाही', असं स्पष्ट करत सलीम कुरेशीचा जामीन न्यायालयानं फेटाळून लावला.

हेही वाचा :

  1. Pune Terror Module to NIA : पुणे दहशतवादी अटक प्रकरणाचा तपास आता ATS कडून NIA कडे हस्तांतरित
  2. NIA Raids Kolhapur : स्वातंत्र्यदिनापूर्वी इचलकरंजीसह हुपरीत एनआयएची छापेमारी; तीन संशयित ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.