ETV Bharat / state

राज्यातील काही जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन तर काही जिल्ह्यात जाणवतोय तुटवडा

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यामुळे ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून काही जिल्ह्यांमध्ये लसीचाही तुटवडा जाणवत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 26, 2021, 6:27 PM IST

Updated : Apr 26, 2021, 10:30 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. यामुळे राज्यात ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजना पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत असून विविध राज्यातून ऑक्सिजन आयात केले जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज व पुरवठ्याबाबत माहिती....

मुंबई

मुंबईसाठी दररोज 235 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सध्या ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. नव्याने 12 ठिकाणी 16 हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारले जात आहेत. मुंबईत दररोज 30 ते 50 हजार लसीकरण केले जाते. कालच (दि.25 एप्रिल) 1 लाख 58 हजार लसीचा पुरवठा झाला आहे. यामुळे पूढील तीन दिवस लसीकरण सुरू राहील. मुंबईत आतापर्यंत 22 लाख 37 हजार 283 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

नागपूर

नागपूर जिल्ह्यात साधारण 148 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे, स्थानिक एमआयडीसी कंपन्यांकडून 78 मेट्रिक टनाची गरज भागवत आहे. काही प्रमाणात टँकर हे भिलाई येथून मागवले जात आहे. काल (दि. 25 एप्रिल) दिवसभरात 137 टन उपलब्ध झाले होते. 10 टनाची कमी अधिक प्रमाणात तूट आहे, जे दररोज सरासरी भरून काढण्यासह काही नवीन हवेतून ऑक्सजिन निर्मितीचा 13 टनचा प्लान्ट सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 638 लोकांचे लसीकरण पार पडले आहे. यात लसींचा साठा संपत आला असून सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पुन्हा 1 लाख 30 हजार वॅक्सिनचा ट्रक येणार आहे.

पुणे

जिल्ह्यात ऑक्सिजन 386.01 मेट्रिक टन मागणी असून पुरवठा 302.05 मेट्रिक टनचा होत आहे. मागणीच्या 22 टक्के साठा कमी आहे. एप्रिल महिन्यात 96 हजार 448 रेमडेसिवीरच्या व्हायल्स मिळाले होते. जिल्ह्यात 20 लाख 14 हजार 59 नागरिकांचे लसीकरण झाले असून 78 हजार 667 लसीकरणचा उपलब्ध साठा उपलब्ध आहे.

नाशिक

जिल्ह्यात 130 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून केवळ 85 मेट्रिक टन पुरवठा आहे. मागणीच्या 45 मेट्रिक टन कमी पुरवठा होत आहे. आतापर्यंत 6 लाख 20 हजार 957 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोल्हापूर

दररोज सुमारे 30 मेट्रिक टनच्या आसपास ऑक्सिजन गरज आहे. दररोज सुमारे 20 मेट्रिक टन शिल्लक राहतो तसेच उपलब्ध सुद्धा होत आहे. आठवड्याला 2 लाख 80 डोस लसीची मागणी असून 74 हजार डोस उपलब्ध आहेत. यातून पुढचे 3 दिवस लसीकरण सुरळीत चालण्याची शक्यता आहे.

जळगाव

मागील 24 तासांत जळगाव जिल्ह्यात 38 ते 40 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. 30 ते 35 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मागील 24 तासांत उपलब्ध झाला आहे. मात्र, 8 ते 10 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पहिला डोस घेतलेल्या लाभार्थींची संख्या 2 लाख 23 हजार 150 असून दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थींची संख्या 39 हजार 912 इतकी आहे. 25 हजार डोस सध्या जिल्ह्यात उपलब्ध आहेत.

चंद्रपूर

जिल्ह्यात दररोज 3 हजार 231 इतक्या जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची मागणी आहे तर पुरवठा केवळ 1 हजार 661 सिलिंडरचाच होत आहे. आजपर्यंत 2 लाख 11 हजार 440 लोकांचे लसीकरण झाले आहे. दर दहा दिवसांची मागणी ही 1 लाख 30 हजार इतकी आहे. मात्र पुरवठा हा 20 ते 25 हजार इतका होत आहे.

रायगड

रायगडात रोज 570 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार केले जात असून 35 मेट्रिक टक ऑक्सिजनची मागणी आहे. आतापर्यंत 1 लाख 90 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबई : भारत पेट्रोलियम कोविड सेंटरला पुरवणार 40 टन ऑक्सिजन

Last Updated : Apr 26, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.