जनतेने आम्हाला विजयी करुन या फकीराची झोळी भरली - पंतप्रधान मोदी
भाजपचा विजय ही विश्वातील सर्वात मोठी घटना आहे. भारतातील जनतेने आम्हाला विजयी करुन या फकीराची झोळी भरली असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले. भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. वाचा सविस्तर...
मराठी मतात फूट पडणाऱ्यांना 'ए लाव रे ते फटाके' एवढेच सांगायचे - उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर यापुढील प्रत्येक निवडणूक युतीमध्ये लढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मराठी मतांमध्ये फूट पडणाऱ्यांना 'ए लाव रे ते फटाके' एवढच सांगायचे असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वाचा सविस्तर...
पवार आजोबा आणि थोरात वडिलांमुळे आजचा विजय - सुजय विखेंची प्रतिक्रिया
माझा विजय पवार आजोबा आणि थोरात वडिलांमुळे झाला, अशी उपरोधात्मत टीका अहमदनगर दक्षिणचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. त्यांनी विजय मिळवल्यानंतर पवार आणि थोरात यांच्यावर शरसंधान साधले. माझ्या वडिलांनी आता लवकर भाजपमध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना केले आहे. वाचा सविस्तर...
नरेंद्र मोदींच्या अभूतपूर्व विजयाबद्द्ल देशातील मोठे उद्योजक म्हणतात..
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी परिवर्तन व्हावे, अशी अपेक्षा उद्योगपती आदि गोदरेज, अनिल अग्रवाल आणि उदय कोटक यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर...
ए लाव रे ते फटाके, वाजव रे तो ढोल..निकालानंतर राज ठाकरेंची भाजप नेत्यांकडून खिल्ली
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात सभा घेतल्यानंतर त्यांच्या लाव रे व्हिडिओ या वाक्याची चांगलीच चर्चा झाली होती. एनडीएला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या लाव रे व्हिडिओ या वाक्याची खिल्ली उडविली आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर फलक लावला आहे. या फलकावर 'ए लाव रे ते फटाके, लाव रे तो ढोल' असे लिहिलेला फलक लावत ठाकरेंची अप्रत्यक्ष खिल्ली उडविली आहे. वाचा सविस्तर...