मुंबई - महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. मात्र किमान समान कार्यक्रमावर आम्ही काम करू. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक परिवार म्हणून काम करणार असल्याचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
लातूर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पाण्यासाठी काम करणार आहे. रोजगाराच्या प्रश्नावर काम करेन, असे धिरज देशमुख म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रमुख अजेंडा आहे. त्यामुळे सुरुवातीलाच त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. शेतकरी खंबीरपणे उभा राहावा आणि तरुण प्रगत व्हावा, अशी या सरकारची मनिषा असल्याचे देशमुख म्हणाले.
हेही वाचा - सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर
धिरज देशमुख हे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे धाकटे पुत्र आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून ते पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. या निवडणुकीत त्यांचे थोरले बंधू अमित आणि ते दोघेही विधानसभेवर निवडून आले आहेत.