मुंबई - 2019 हे वर्ष सरले आहे आणि आज नववर्ष उजाडलेले आहे. याच नववर्षाचे स्वागत सध्या देशात विविध ठिकाणी नागरिक करत आहेत. मुंबईकरांनीदेखील मोठ्या उत्साहात मुंबईतल्या महत्त्वच्या ठिकाणी जल्लोष करत नववर्ष साजरे केले. यामध्ये मरीन ड्राईव्ह, गेट ऑफ इंडिया, जुहू चौपाटी अशा अनेक ठिकाणी मुंबईकरांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
नवीन वर्ष सर्वांना शांततेचे, सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो यासाठी मुंबईकरांनी मित्रमंडळींसोबत एकत्र येत केक कापून फटाके फोडत आनंद साजरा केला.